
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- अहमदपूर तालुक्यातील धसवाडीग्रा.प. अर्तगत असलेल्या खरकाडी तांडा येथे आत्तापासुनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रा.प.च्या दुर्लक्षपणामुळे येथे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.असे येथील तांडा वासीयानी सांगितले आमच्या पाचवीला सटवीने पुंजले का साहेब आम्ही पोट भरण्यासाठी विटभटी ,उसतोडीच्या कामासाठी आम्ही सहासहा महीणे गाव सोडुन जातो व परत आल्यावर तरी आमच्या नशीबी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. आम्ही काही पापकरुण आलोय काय हो साहेब काही करा.
पण आम्हाला पाणी द्या हो असा टाहो खरकाडी तांडा येथील भगवान हेमला राठोड, रामराव हरीचंद्र राठोड, संजय माधव राठोड ,नामदेव पुनाजी जाधव, भीमराव थावरू राठोड , बाबुराव देवला जाधव, पंडित राठोड , उत्तम थावरू राठोड ,राजू गोपीनाथ राठोड, शंकर रामराव राठोड मंडुबाई भगवान राठोड , जनाबाई रामराव राठोड, परुबाई नामदेव जाधव , सत्यभामा कांतराम चव्हाण , सुरेखा संजय चव्हाण, ज्योती विठ्ठल जाधव, निलूबाई माधव राठोड ,यमुनाबाई बाबुराव जाधव , शेवंतबाई पंडित राठोड ,सत्यभामा संजय राठोड ,आणिताबाई भिमराव राठोड यांनी केला .
आम्ही कुठुन तरी घागरभर पाणी आणुन आमची तहाण भागवतो पण आमचे जनावरे आम्हि कुठे घेउन जावे आमच्या लहाण लहाण मुलाला कडेला घेउन पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे तेही मिळेल तेथुन पाणी आनावे लागते ग्रा.प.ने यासाठी काहीही पर्याय करून पिण्याच्या पाण्याची सोय करावे. येथीलच विद्यमान सदस्य यांनी सांगितले की आज जवळपास दोन महीणे झाले येथे पाणी टंचाई आहे.व येथील ग्रामसेवक गावाकडे लक्ष देत नाही अहमदपूर वरून कारभार पहतात असे सांगितले आहे .आणि ५ वर्षांपासून पाणी विकत आहे तरी खरकाडी तांडा येथे पाण्याची सोय केलेली नाही .
ग्रामस्थांनी वारंवार सांगत आहेत तरी कोणीपन लक्ष देत नाहीत सरपंच प्रेमचंद यांना पाणी टंचाई विषयी विचारले असता त्याने बोलतो मी म्हणून दुर्लक्ष करत आहेत . आम्ही तांड्यासाठी नविन पाईपलाईनही केली स्वतः पैसे खर्च करून तरी उन्हाळा असो किव्हा पावसाळा असो आम्हाला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे. तांड्यावर लवकरात लवकर पाण्याची सोय करा असे ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.