
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता. प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- दि: २७/०३/२०२२ रोजी सकाळी १० वाजता रामापूर तांडा येथे गोर बंजारा लोककला (लेंगी) महोत्सवाचे आयोजन गोर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे तरी बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोर सेना महिला प्रदेश अध्यक्ष सौ. साधनाताई जाधव यांनी केली आहे. या क़ार्यक़्रमास उपस्थित सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ,विचार .जा.भ. जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास भूकंप व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.विजय वडेट्टीवार , संत सेवालाल महाराज संस्थान अध्यक्ष पोहरागड मा.कबीरदास महाराज,गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरूणभाऊ चव्हाण, दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी राठोड रमेश,गोर सेना अहमदपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव , किरण बापूराव राठोड बहूजन कल्यान,ओबीसी नामांकित गाजलेल्या लेंगी पथकाची पण लोककला सादर होणार आहेत. तरी सर्व गोर बंजारा बाधव या लेंगी महोत्सवाचा आनंद घ्यावा. या गोर बंजारा लोककला (लेंगी) महोत्सव मूख्य आयोजन गोर सेना, गोर सिकवाडी,व बंजारा समाज यांनी केला आहे. ठिकान रामापूर तांडा ता.पालम जि.परभणी