दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
परळी- परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिरसाळा येथील जागेत उपबाजार पेठे अंतर्गत ९३ गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी शेकडो एकर जमीन घेऊन ठेवली आहे. यामुळे ही बाजार समिती समृद्ध व श्रीमंत आहे. नवी मुंबईच्या मार्केट कमिटी प्रमाणे या मार्केट कमिटीचा देखील राज्यभरात नावलौकिक होईल, असे गौरवोद्गार धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना काढले. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता समाचार घेतला.
यावेळी आमदार संजय दौंड, शिवाजी सिरसाट, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर आघाव यासह अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.