
दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवन :- भिगवन स्टेशन मधील वार्ड क्र. 5 मधील अंतर्गत भूमिगत गटरा चे भूमिपूजन करण्यात आले. सदरील भूमिगत(बंदीस्त)गटर ही जालिंदर चव्हाण यांच्या घरापासून प्रशांत शेलार यांच्या घरापर्यंत करण्यात येणार आहे. भूमिगत गटर ची मागणी ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. या परिसरात भूमिगत गटर नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गधी व रोगराई पसरत होती. परंतु होणाऱ्या भूमिगत गटर मुळे त्यांस आळा बसणार आहे त्यामुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले. या वेळी कृषि उत्पन्न बाजार समितिचे मा उपसभापती पराग जाधव यांनी सदरील काम हे उत्कृष्ट पद्धती चे व मजबूत झाले पाहिजेत, अशी सूचना संबधित ठेकेदार यांना दिली.
या प्रसंगी भिगवन चे सरपंच तानाजी वायसे,मा उपसरपंच अभिमन्यु खटके, गुलामहुसेन शेख,ग्रामपंचायत सदस्य आबा काळे, कपिल भाकरे, जयदीप जाधव,तुषार क्षीरसागर, बाळासाहेब भोसले,गुरप्पा पवार, दत्ता धवड़े, मा ग्रामपंचायत सदस्य बाबासो शिंदे,जावेद शेख,अनिल देसाइ, श्रीरंग देसाई, विठ्ठल मस्के,जुबेर शेख तसेच राजेंद्र नागवे,दत्तात्रय अनभूले, विशाल खड़के, राहुल वागसकर,अमीर शेख,जब्बार शेख, शहाजी कदम, शशिकांत पवार, माउली खड़के, बाबूराव सोनवणे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.