
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील समाजसेवेत तत्पर व अग्रगण्य एक सामाजिक संस्था कर्मयोगी फाउंडेशन च्या वतीने नवनवीन समाज उपयोगी उपक्रम चालत असतात हे सर्वांना माहीतच आहे त्यातच आता शासन आपल्या पर्यंत मदत देईल यात खूप वेळ निघून जातो हे पाहता कर्मयोगी फाउंडेशन ने गरीब अपंग व्यक्ती स्त्री-पुरुष यांना तीनचाकी सायकल वाटप करावे असे ठरविले आहे परंतु संस्थेला कोणताही शासकीय फंड वा मदत मिळत नसल्याने लोक सहभागातून हा उपक्रम पार पाडण्यासाठी देणगीदार, मदतगार, यांनी पुढे यावे व संस्थेमार्फत आपले दान प्रत्यक्ष गरजू पर्यंत पोहचवावे हे आव्हान संस्थेचे अध्यक्ष ललित ढेपे यांनी केले आहे.
आज शासन तीनचाकी पेट्रोल वाहन विविध योजने अंतर्गत अपंग व्यक्तीला देते पण मागणी आज होते तर पुरवठा कधी होईल राम जाणेच असते त्यातही इंधन म्हणून पेट्रोल लागते, आजचे पेट्रोल चे दररोज वाढणारे भाव अपंग व्यक्ती ला न परवडणारे आहे म्हणून कर्मयोगी फाउंडेशन व लोक सहकार्याने हा उपक्रम करण्याचे योजिले आहे तरी, सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींनी संस्थेला विविध समाज उपयोगी सत्कार्यात देणगी देण्याकरिता संपर्क करावा व आर्थिक मदत किंवा एक तरी तीनचाकी सायकल भेट द्यावी ही विनंती संस्थेमार्फत करण्यात येत आहे. रीतसर पावती शिवाय कोणताही व्यवहार आम्ही करत नाही
तर मग आजच आपले दान निश्चित करा.
कर्मयोगी फाउंडेशन महाराष्ट्र
जि.अमरावती
रजिस्टर न – इ 1256
संपर्क – 7020384505