
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- शेटफळ हवेली गावचे युवा नेतृत्व, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.श्री.संजय (मामा) शिंदे यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील हजारो सर्व सामान्य, युवकांचे आशास्थान असलेले एक कुशल संघटक म्हणजे संजय(मामा) शिंदे असुन आजपर्यंत त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात , प्रशासकिय क्षेत्रामध्ये नेहमी सर्व सामान्य जेनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे,त्याच बरोबर त्यांनी संपूर्ण तालुक्यात हजारों युवकांचे संघटन केले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये अग्रगण्य समजली जाणारी शेटफळ हवेली ग्रामपंचायत ही आजपर्यंत संजय (मामा) शिंदे यांचा ज्या बाजूने कल असेल त्या बाजुने सत्ता राहिली आहे.त्यामुळे सर्व त्यांना किंगमेकर समजतात. संजय मामा हे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे काम करतात ते पाटील साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत.हर्षवर्धन पाटील साहेब यांना आजपर्यंत शेटफळ हवेलीतील कोणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी देण्याची मागणी केली नाही ना भाऊंनी उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे यावेळी मात्र युवकांचे नेतृत्व असणारे संजय मामा शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. येवढे त्यांचें राजकीय वजन असतानाही त्यांनी आजपर्यंत कधीच स्वार्थासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यावेळी संजय (मामा) शिंदे यांचे समर्थक युवक कार्यकर्ते यांनी बैठक घेऊन संजय (मामा) शिंदे यांनी, संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबर असणारी पुणे जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. परंतु संजय (मामा) शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्या परिषद गटातुन निवडणूक लढवावी याविषयी मात्र गुप्तता पाळली आहे.
इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच पुढील महिन्यात ३ तारखेला देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे इंदापूर दौ-यावर येत असून यानंतरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकींचे चित्र स्पष्ट होणार आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दौ-यानंतरच संजय (मामा) शिंदे हे कोणत्या जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवणार का नाही याचे चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी संजय (मामा) शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या विषयी कोणतेही चर्चा या कोणाशी बोलन झाले नसल्याचे सांगितले , परंतु निवडणूक लढवणार का यावरती त्यांनी बोलने टाळले.