
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री, रमेश राठोड
सावळी सदोबा :- आर्णी तालुक्यातील असलेल्या मौजा आयता येथे आर्णी -केळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय ,आमदार सन्माननीय संदीप भाऊ धुर्वे साहेब,आयता येतील घरगुती गॅस स्फोटामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये सांत्वनपर भेट म्हणून आमदार साहेबांनी या गावाला भेट दिली .याप्रसंगी आयता गावाचें सरपंच व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेबांनी जयस्वाल कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून चेकच्या स्वरुपात भेट दिली .व शासकीय योजनेचे या कुटुंबाला आर्थिक मदत जेवढ्या होईल त्या प्रयत्नांना नुसार देण्याचे काम करेल.
माझ्या मार्फत जे काय आहे ते मी त्यांना शंभर टक्के मदत देऊ अशी खात्री दिली व त्यावेळेस सर्कल मधील प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भाऊ राठोड व विजय संमगिर, त्यासोबत या विभागाचे बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे सुरेश भाऊ पवार, किसन भाऊ राठोड, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष रविभाऊ राठोड व सावळी सदोबा येते दिलीप भाऊ यांच्या घरी त्यांच्या मुलाचे लग्न प्रसंगी त्यांना भेट दिली या विभागाचे जे काही समस्या असतील ते खात्रीच्या सोडले जाईल असे आश्वासन लोकप्रिय आमदार संदीप भाऊ धुर्वे साहेबांनी दिले.
सोबतच जवळा 132 के व्ही वरून कृष्णनगर फाईव्ह केमी साठी एक कोटी 18 लाख रुपये मंजूर झाली असून सावळी सावळी परिसरातील विद्युत कमी दाबाचा विषय निकाली काढण्यात आलेला आहे विद्युत वितरण कंपनी यवतमाळ मुख्य अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्याशी संपर्क साधून होल्टेज वाढविण्यासाठी कॅपिटर बॉक्स करण्याचे आदेश दिले या वेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्कलमधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.