
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
इस्लामाबाद :- पाकिस्तानात आज (रविवार) मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून याचे संकेत मिळत होते. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब चॅनेलचं नाव बदलल्यानं उद्या पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) जाहीर सभेत राजीनामा जाहीर करुन पद सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या इम्रान खान यांनी स्वतः ही सभा बोलावली आहे.
त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्सान (पीटीआय) या पक्षाचं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण विरोधी पक्ष इम्रान खान यांचं सरकार पाडण्यासाठी नॅशन असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहेत. इम्रान खान यांना देशांतर्गत आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यातच विरोधकांनी त्यांच्या सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.