
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पीएम गति शक्तीच्या मदतीने, जिथे योजना पूर्ण करण्यासाठी कमी वेळ लागतो, तिथे खर्च देखील कमी होतो. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. गोयल म्हणाले की,” गती शक्ती देशातील योजना एकत्रित करण्यात मदत करत आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होते.”
वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की,”पीएम गति शक्तीमध्ये देशातील प्रत्येक गोष्टीचे भूस्थानिक मॅपिंग तसेच विविध स्तरांवर नकाशांवर भर देण्यात आला आहे. परिणामी योजना एकत्रित केली जाते आणि असे केल्याने वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.” पियुष गोयल म्हणाले की,”जंगल किंवा रेल्वे मार्गामुळे रखडलेले प्रकल्प याची उदाहरणे आहेत. पण पीएम गती शक्तीमुळे हे चित्र आता बदलले आहे आणि प्रकल्प लटकत नाहीत.”