
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधि
मोहन आखाडे
औरंगाबाद :- हिंदू धर्म प्रथेनुसार हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याला साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने सर्व धार्मिक संघटना, संस्था यांची हिंदु नववर्ष स्वागत समितीतर्फे रविवार, २७ रोजी बैठक आयोजित केली आहे. सकाळी ११ वाजता हॉटेल यशोदीप येथे होणार आहे. याबाबत हिंदु नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माहिती दिली.
या बैठकीस श्री विभुषीत जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज संप्रदाय, शिवसेना-युवासेना, जय चतुर्थी प्रतिष्ठाण, रेणुका माता मंदिर ट्रस्ट, वीरशैव लिंगायत व जंगम समाज, राष्ट्रसंत श्री भैय्यु महाराज सुर्योदय परिवार, संत श्री वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंदिर संरक्षण राष्ट्रीय धर्म संसद, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, बजरंग दल, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, सनातन संस्था, पतीत पावन संघटना, स्वातंत्रवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, ब्राम्हण युवक मंडळ, पुरोहित संघ, सकल मारवाडी समाज, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, श्री योग वेदांत सेवा समिती-संतश्री आसाराम बापु संत सेवा संघ, माहेश्वरी समाज, माहेश्वरी युवा मंच, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी प्रगती मंडळ, रेड स्वस्तिक सोसायटी, वेदविद्या प्रचार समिती, इस्कॉन, शिवराम प्रतिष्ठाण, गुजराती समाज, गुजराती समाज युवा मंच, गुरुव्दारा गुरुगोविंदसिंगपुरा, गुरुव्दारा, सिंधी कॉलनी, गुरुव्दारा, धावणी मोहल्ला, अखिल भारतीय कुमावत समाज, राजपुत संघटना, राजपूत संघर्ष समिती, श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळ, श्रीराम मंदिर ट्रस्ट, जसवंतपुरा, जनसेवा क्रिडा व सांस्कृतिक मंडळ गवळीपुरा, अखिल भारतीय वारकरी मंडळ, संत निरंकारी संघ, स्वाध्याय परिवार, संतकृपा प्रतिष्ठाण, अनिरुध्द बापु उपासना फाऊंडेशन, भगवान महाराज संप्रदाय, सिंधी समाज बहावलपुरी पंचायत, सधांशु महाराज संप्रदाय विश्वजागृती मिशन सत्संग समिती, अध्यक्ष महावीर जयंती उत्सव समिती, अग्रवाल दिगंबर जैन मंदिर सराफा, अग्रवाल दिगंबर जैन मंदिर हडको, श्री श्री रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हिंग), पतंजली योगपीठ, भजनी मंडळ, पेशवा संघटना, शिवसेना महिला आघाडी, दत्तात्रय सत्संग मंडळ विविध सांप्रदाय सहभागी होणार आहेत.
या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.आशी माहिती प्रसिध्दीप्रमुख शिवसेना
सुनील खडके यांनी दिली.