
दैनिक चालु वार्ता
धडगांव प्रतिनिधी
विरेंद्र वसावे
धडगांव :- पोलीस स्टेशन अ.मृ रजी नं / २०२२ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे दि . २५.३.२०२२ रोजी दाखल असुन यातील मयत अनोळखी अंदाजे २३ वर्षे वयाचा पुरुष इसम नाव गाव माहीत नाही याने धडगाव बसस्थानक आवारातील प्रवाशी थांबासाठी बनविलेल्या पत्राशेडच्या छताच्या लोखंडी अँगलला कापडी पट्टा व नायलॉनची पांढरी पट्टीच्या सहाय्याने गळफास घेवून मयत झाला आहे . मयत गळफास घेतलेल्या ठिकाणी दगडी फरशीवर खडुने वैशाली नावाच्या मुलीला उद्देशुन प्रेमासंबंधी मजकुर लिहीला आहे . सदर मजकुर मयताने लिहीला असावा . यावरून मयताने एकतर्फी प्रेम प्रकरणावरुन गळफास घेवून मरण पावला असावा . तरी सदर इसमाबाबत आपल्या पो.स्टेस मिसींग दाखल आहे अगर कसे याबाबत शहानिशा करुन आपले अधिनस्त अंमलदार मार्फत सदर इसमाबाबत माहीती मिळून आल्यास इकडील पो.स्टेला कळविणेस विनंती आहे .
१ ) वय – अंदाजे २३ वर्ष वयाचा ५ फुट ६ इंच उंचीचा ,
२ ) उंची ३ ) बांधा सळपातळ बांधा असलेला तरुण , ४ ) वर्ण सावळा ५ ) केस काळे व मोठे ( ६ ) पोषाख अंगावर निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या भुरसट रंगांची जिन्स पॅन्ट पायात पांढ – या रंगाचे स्पोर्टस् ७ ) ओळखचिन्ह – डाव्या हाताच्या पंजावर मनगटाजवळ A असे गोंदलेले व डाव्या हातात स्टिलचा कडा घातलेला व उजव्या हाताच्या मनगटावर मण्यांची माळ गुंडाळलेली. जेणेकरून त्याचे नातेवाईक , आई वडील यांचा तपास लागेल . तपास लागल्यास धडगाव पोलीस स्टेशनची संपर्क करण्यास सांगावं . आपले हे कृत्य पोलीसला तपासकामी मदत होईल आणि पीडित परिवाराला वेळीच तात्काळ माहिती पोहचेल.