दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
ठाणे
ठाणे जिल्हा पालक व नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्हा शिवसेना यांनी नवरात्र निमित्त दुर्गा रक्तदान व महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या महारक्तदान शिबिरात आमदार श्रीनिवास वनगा यांनी सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन करून रक्तदान केले. यावेळी नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थीत होते.तसेच ठाणे जिल्हा शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी देखील रक्तदान केले.