
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
उन्हाळा हा गर्भवती महिलांसाठी एक मोठ आव्हान आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गरोदर मातांनी विशेष काळजी काळजी घेणं आवश्यक आहे. गरोदरपणात रक्तदाबाचं नियंत्रण बदललेलं असतं. मेंदूमधील रक्तदाबाचं ऑटो रेग्यूलेशन बदललेलं असतं. यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. अति उन्हाच्या कडाक्यात गरोदर आणि बाळंतीणींनी बाहेर पडू नये. गरोदरपण आणि बाळंतपणात त्वचा अति नाजूक झालेली असते. त्यामुळे त्वचेवर, विशेषतः चेहऱ्यावर काळे चट्टे पडतात ते कायम स्वरुपी राहण्याची शक्यता असते.
शिवाय अति उकाड्यामुळे घाम येणं, कंड, बुरशी, लघवीचा जंतूसंसर्ग अति प्रमाणात होताना दिसतो. उन्हाळ्यातील गरोदरपण बरंच कष्टप्राय आणि त्रासाचं ठरू शकतं. साध्या गोष्टी करतानासुद्धा थकवा, अतिघाम, अनुभवास येतो. अति उष्णतेमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्माघात हा त्यातील गंभीर प्रकार आहे. गर्भाधारणेच्या आसपास, म्हणजे पहिल्या तीन महिन्यांमध्ये मातेचं तापमान १०२ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास (ज्वर किंवा उष्णतेमुळे) गर्भामध्ये काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. या व्यंगाचं उदाहरण म्हणजे गर्भाच्या मेंदूची वाढ न होणं, त्यास कवटी नसणं, मणक्यांमध्ये दोष. असे आजार फॉलिक अॅसिड