दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या केंद्रस्तरीय joint CSIR-UGC NET JUNE 2021 परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात इंदापूर येथील वर्षा हनुमंत भोंग- व्यवहारे हिने यश संपादन केले तसेच या बरोबरच PET आणि SET या परीक्षेत देखील पहिल्याच प्रयत्न संपादन केले वर्षा ही इंदापूरमधून पहिलीच अशी परीक्षार्थी आहे की जिने एकाच वर्षात पहिल्याच प्रयत्नात तीन परीक्षांमध्ये हे यश संपादन केले. या यशाबद्दल सर्व स्तरातून वर्षाचे कौतुक होत आहे.
हे यश आपले पती , सासू, सासरे ,आई, वडील , भाऊ यांच्या पाठिंब्यामुळे शिक्षणात संपादन करू शकले अशी प्रतिक्रिया वर्षा हीने यावेळी दिली या यशाबद्दल आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इंदापूर चे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते वर्षा चा सत्कार करण्यात आला.