
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
माझ्या शिवछत्रपती राज्याची ३६५ साजरी केली तरी मावळ्यात तोच उत्साह राहील – शिवव्याख्याती भाग्यश्री मोहिते
लोहा :- लोहा तालुक्यातील पिंपळगाव येथे 27 मार्च 2022 रोजी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात. या शिवजयंती महोत्सवात डीजे बँडला व अनावश्यक खर्चाला फाटा देत सांप्रदायिक पद्धतीने टाळ मृदंगचा तालावर शिवनाम व हरिनामाच्या गजरात गावातील प्रमुख रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती मिरवणूक झाल्यानंतर पिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अन्नदान करण्यात आले.
सायंकाळी शिवश्री भाग्यश्री मोहिते पाटील व लखन मोरे यांचे व्याख्यान झाले त्यानंतर शाहीर सदाशिव पळशीकर व सुधीर पळशीकर यांचा शाहिरी जलसा सादर करण्यात आला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे व शिव गीते सादर करण्यात आली अशी माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश शंकरराव सावळे व उपाध्यक्ष राजेश गोविंदराव तोनचिरे ओम व्यंकटराव सावळे भगवान येवले पांडुरंग येवले , साहेबराव तोडचिंरे मुरलीधर येवले व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.