
दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ भुस्से
सौ.डोंगळीकर,देशमुख,पाटील, डॉ.पल्लेवाड,खिल्लारे, डॉ.नामवाड, कावळे,डॉ.सुरनरे समतागौरव पुरस्काराने सन्मानित
अर्धापूर :- अर्धापूर येळेगांव येथे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र,पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ व मातोश्री जनाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कला महोत्सव व मान्यवरांच्या गौरव सोहळ्याला उदंड प्रतिसाद देऊन लोकपारंपारिक कलावंतांनी आपल्या विविध कलांचे सादरीकरण केले तसेच, यावेळी विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान असलेल्या मान्यवरांना समतागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील कपाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर,दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील निर्माता,दिग्दर्शक एस.व्ही.रमणराव यांच्या शुभहस्ते व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव कल्याणकर,बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधूताई देशमुख,सौ.नंदाताई किरजळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे,स्वागताध्यक्ष वसंतराव कपाटे,सरपंच सौ.सरस्वती गंगातीर,डॉ.मनोज राऊत, नागोराव मेंढेवाड,श्रीमती आर.जी.गुंडे,श्रीमती एस.एम. श्रीमंगले,पत्रकार सखाराम क्षीरसागर,गोविंद टेकाळे,माजी सरपंच शंकर ढगे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बहुजन टायगर युवा फोर्सचे प्रदेश प्रवक्ता तथा,आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे यांनी प्रास्ताविकातून लोकपारंपारिक कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी तसेच,लोकपारंपारिक कला जोपासण्यासाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या माध्यमातूनच्या विविध उपक्रम व प्रसंगी केलेल्या आंदोलनांची माहिती देऊन आपली भूमिका मांडली.
सोबतच,समाजपरिवर्तनासाठी सदैव कार्यरत असलेल्या लोकपारंपारिक कलावंतांना सातत्याने उपेक्षित ठेवण्याऐवजी त्यांच्या प्रेरणादायी कर्तव्यतत्परतेची जाणीव ठेवून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक उत्तम कानिंदे यांनी केले. याप्रसंगी यशस्वीनी अभियानाच्या समन्वयीका एँड.कल्पनाताई डोंगळीकर, सेवानिवृत्त सहा.वनसंरक्षक के.डी.देशमुख बारडकर, ख्यातनाम हास्यसम्राट व झि. टिव्ही स्टार सिद्धार्थ खिल्लारे, सुप्रसिद्ध आर्थोसर्जन डॉ.इरवंत पल्लेवाड,लेखक- दिग्दर्शक व गीतकार भिमराव कावळे,डॉ. पि.बी.नामवाड,लोककवी वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा.सुरेश पाटील,डॉ.सीमा सुरनरे आदी मान्यवरांना समतागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच,कोविड-१९ च्या कालावधीत शासन निर्देशानुसार जनजागृती व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्तव्यतत्पर कोरोनायोद्धा असलेल्या येळेगांवच्या आशा स्वयंसेवीका ललिता गंगाधर गोवंदे,मिना पुंडलिक सावते, धम्मदिनी सुभाष घोडके यांच्यासह जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. व्यंकट महाराज जाधव,सदस्य ह.भ.प.उद्धव महाराज भारती, के.डी.पाटील बेंबरे,ह.भ.प. अरविंद महाराज मोरे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कला महोत्सवात हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे,शाहीर बापुराव जमदाडे,शाहीर विजयानंद परघणे,शाहीर बाबुराव गाडेकर,शाहीर शंकर गायकवाड,गोरखनाथ मस्के, शाहीर नरेंद्र दोराटे,किशन ठमके, अविनाश कदम,शिवाजी डोखळे,सुरेखा डोखळे,प्रकाश कदम,हरि जाधव,परमेश्वर वालेगांवकर,जळबा जळपते, माया खिल्लारे,अशोक प्रचंड, बबन दिपके,प्रविण सोनकांबळे, सचिन डोपले,भुजंग कांबळे, सविता गोदाम,नाटककार अशोक हनवते,गौत्तम जोंधळे, प्रकाश कांबळे,माधव वाघमारे कृष्णूरकर,सुर्यउद्धव खिल्लारे, भुजंग मुनेश्वर, भुजंग लोणे कल्याण डोणेराव,नामदेव परघणे आदी लोकपारंपारिक कलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केल्यानंतर त्यांचाही गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कलामहोत्सवास नांदेडसह हिंगोली,परभणी आदी जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील तसेच,आंध्रप्रदेश व तेलंगणातील अनेक लोकपारंपारिक कलावतांची व परिसरातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष वसंतराव कपाटे, सहस्वागताध्यक्ष आनंदराव कपाटे,संयोजन समितीचे त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे अध्यक्ष तथा,भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालक आनंदराव सावते,संयोजक संभाजी सावते, आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे, बाबुराव कपाटे,गिरजाजी सावते,संजय सावते,किरण वाघमारे,प्रभु कपाटे,यशवंत थोरात,ब्रम्हाजी सावते,महेंद्र सावते,जितेंद्र सावते,सदाशिव जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.