
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील बारुळ येथील गोदाम किप्पर यांनी मनमानी चालवली असुन 50 किलोच्या गोणीतुन दोन ते तिन किलो माल काढुन घेत आहे.राशेन दुकान मालकांना एका क्विंटल मागे 5ते 6किलो माल कमी दिल्या जात असल्याने राशेन दुकान मालक हतबल झाले आहेत.त्यामुळे हे दुकांनचालक लाभार्थांना माल कमी देत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.त्यामुळे स्वस्त धान्य मालात घोटाळा करणाऱ्या बारुळ येथिल गोदाम किप्परला निलंबीत करा अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
कंधार तालुक्यातील बारुळ येथील राशेन गोदामवर खोब्राजी जाधव नावाचा गोदाम किप्पर या पदावर गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत आहे.या गोदम किप्परच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने यांची बदली होत नसल्याची चर्चा आहे. बारुळ गोदाम अंतर्गत जवळपास 70 स्वस्त धान्य दुकान आहेत. या गोदामला शासनाच्या वतिने सिल असलेली गोणी दिली परंतु हा गोदाम किप्पर हमालाच्या मार्फत 50किलोच्या गोणीमधुन दोन ते तिन किलो माल काढुन घेत असतो.तर काही गोणी न फाडता बंब मारुन माल काढल्या जातो.
स्वस्त धान्य दुकानदारांना क्विंटलामागे पाच ते सहा किलो माल कमी जात असल्याने हे स्वस्त धाने दुकांनदार तोंड दाबुन बुक्याचा मार सहन करत आहेत.त्यामुळे हे दुकानदार काही लाभार्थांना माल कमी देत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.माल कमी का दिला जात असल्याने स्वस्त धान्य दुकानदार हेच बदनाम होत आहेत.तर गोदाम किप्पर मात्र मालामाल होत आहे. महसुल विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या तीन वर्षाला बदल्या होत असतात परंतु बारुळ येथिल गोदाम किप्पर यांची बदली का होत नाही.?हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
महसुल विभागातील अधिकारी यांच्याशी यांचे कनेक्शन आहे.विशेष बाबा म्हणजे तपसाणी साठी येणाऱ्या आधिकाऱ्यांना खुश करण्याची कला या गोदाम किप्परकडे असल्याचे ही समोर येत आहे.राजकीय सामाजिक व काही लोकांच्या कार्यक्रमाना आर्थिक रसद दिल्या जात असल्याचे गावकऱ्यांतुन बोलल्या जात आहे. तर एका मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला ही आर्थिक माया दिली जात असल्याने हा गोदाम किप्पर गेल्या अनैक वर्षापासून याच ठिकाणी तळ ठोकुन बसला आहे.यांच्या विरोधात सर्वच स्वस्त धान्य दुकानदार असुन त्यांना फक्त बंड करता येत नाही.
शेणावर धोंडा मारुन अंगावर शिंथोंडा घेण्या पेक्षा हे स्वस्त धान्य दुकानदार बुक्याचा मार सहन करत आहेत.याचा फाटका लाभार्थांना बसत आहे.त्यामुळे या गोदाम किप्परच्या मुसक्या आळवल्यास सर्व लाभार्थांना नियमानुसार माल मिळेल. त्यामुळे बारुळ येथिल गोदाम किप्पर यांनी राशेन धान्य मालात केलेल्या घोटाळ्याची चौकशी करुन यांना निलंबीत करण्यात यावे आन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतिने दिनांक 4 एप्रिल रोजी तहसिल कार्यालया कंधारच्या समोर उपोषाणला बसणार असल्याचा ईशारा निवेदनाव्दारे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिला आहे.