
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारुती कदम
वडेपुरी :- आंबे सांगवी मध्ये दिनांक 27 मार्च दह2022 रोजी रविवारी मोरया हॉस्पिटल तर्फे डॉक्टर दीपक भारती सर यांनी आंबेसांगवी येथील ग्रामस्थांसाठी अखंड हरिनाम सप्ताह च्या कालच्या दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये मोरया अर्थोपेडीक हॉस्पिटल तर्फे मोफत तपासणी व रुग्णांना समुपदेशन केले अशा पद्धतीने हे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी गावातील अनेक गरजू रुग्णांनी ह्या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी गावचे उपसरपंच विक्रम पाटील कदम, गणपतराव कदम, श्रीराम पाटील कदम, राम पाटील सावंत ,शिवसंभा कदम अशोक कदम, गंगाधर कदम ,बाबुराव पाटील सावंत ,सुदाम पाटील उमरेकर,जिवनदास कदम,वैभव सावंत, गोविंद औंढे,नितीन कदम, असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व ह्या शिबिरांमध्ये अनेक रुग्णांनी लाभ घेतला.
डॉक्टर साहेबांचा यथोचित असा सन्मान नागेश कदम यांच्या वतीने करण्यात आला ह्या तपासणी शिबिरास महिला मंडळी व पुरुष मंडळी यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि डॉक्टर साहेबांनी योग्य असे मार्गदर्शन व तपासणीकेली व शरीराला व्यायामाची गरज आहे असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.