
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- स्टार्स प्रकल्प अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे स्वयंसेवी संस्था प्रथम,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड डायट द्वारा आयोजित शाळापुर्व तयारी अभियान केन्द्र स्तरीय प्रशिक्षण ढाळेगाव केन्द्रातील वर्ग 01 ते 05 शिकवणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच कार्यक्षेत्रातील कार्यरत सर्व अंगणवाडी च्या अंगणवाडी कार्यकर्ता यांचे एक दिवसीय प्रशिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढाळेगाव येथे यशस्वी रीत्या संपन्न झाले.
प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणुन शिक्षण विस्तार अधिकारी, खंडाळी बीट तथा केंद्र प्रमुख ढाळेगाव चे श्री शिंदे बी.एन.,
मुख्याध्यापक जि.प. के. प्रा. शा. ढाळेगाव शंकरराव कदम
तसेच मुख्याध्यापक जि.प. प्रा. शा. मावलगाव सुजितराव गायकवाड, जि प प्रा. शा धसवाडी माधवराव पवार, सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षिका, तसेच अंगणवाडी ताई
हे उपस्थित होते.
सुलभक:-
1) श्री चोले एल. पी
निरीक्षक:-
1) श्रीमती दंडिमेताई
सुपरवायझर.. अंगणवाडी
सर्वप्रथम गावात दवंडी देण्यात आली, त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली….. सर्व प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांना शाळेत बोलावून प्रत्यक्ष (DEMO) यावेळी 7 टेबलावर 14 जणांची निवड करून प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवावी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
टेबल क्रं 1)
1)श्रीमती गुदळे मँडम
2)श्रीमती तत्तापुरे मँडम
टेबल क्रं 2)
1)श्री नखाते सी. जी.
2)श्री शिसोदे एच. व्ही.
टेबल क्रं 3)
1) श्रीमती वाघमारे के जी
2)श्रीमती हुडगे एम जी
टेबल क्रं 4)
1) श्रीमती सूर्यवंशी के एन.
2)श्रीमती कांबळे एम एस
टेबल क्रं 5)
1) श्री इरले एस.जी.
2) श्री.गुळवे बी. डी.
टेबल क्रं 6)
1) श्री.वाघमारे एम.बी.
2) श्री ढाकणे जी. डी.
टेबल क्र7)
1)श्री उजनकर डी.आर
2) श्री ढाकणे एस.बी.
या सर्व शिक्षक बांधवांनी प्रवेश प्रक्रियेचा Demo तयार करून प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया कशी राबवता येईल हे सांगितले. सन 2019 पासुन कोविड-19 या महामारीचा सर्वच घटकावर परिणाम झाला. लहान मुलांनाही या जागतिक महामारीने बंदीस्त करून टाकले.याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाड़ी चा अनुभवच घेता आलेला नाही.
या मुलांची व्यवस्थीतपणे शाळापुर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकु शकतील.
यासाठी मार्च- मे /जुन 2022 मध्ये मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक या सर्वांनी मिळून शाळापुर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर राबवायचे आहे.
अभियानाचे स्वरूप :-
1) इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे. पालकांचे गट करणे.
2) शाळा, गाव, वस्ती स्तरावर शाळापुर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे
यात पालक आपल्या मुलांकडुन कशाप्रकारे शाळापुर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगावयाचे आहे. पहिलीत दाखल होणार सर्व मुलांना शाळापुर्व तयारीचा एक संच दिला जाईल.
पालकांना विकास पत्राच्या मदतीने कृती समजावून सांगायच्या आहेत.
3) पालक व मुले शाळापुर्व तयारीच्या कृती घरी तसेच गटात करतील. आठवड्यातून एकदा पालक गटात चर्चा करून कृती समजुन घेतील. मार्च- मे -जुन दरम्यान 10-12 वेळा पालक गटांना स्वयंसेवक, शिक्षक, अंगणवाडी ताईंच्या भेटी होतील.
आयडिया कार्डच्या मदतीने पालकांना मार्गदर्शन करतील.
4) दुसरामेळावा (शाळापुर्व तयारी मेळावा) जुन महिन्यात या मेळाव्याचे आयोजन करावे. विकास पत्राच्या मदतीने मुलांची प्रगती समजुन घेऊन शाळापुर्व तयारीचे प्रमाणपत्र दिले जाईल. यावेळी इयत्ता पहिलीत या मुलांचे विशेष स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करायचा आहे. या अभियानासाठी लावणारे आवश्यक साहीत्याचा पुरवठा प्रथम या स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येणार असुन फक्त सरकारी शाळांतून (जि.प.& न. प.) हे अभियान राबवले जाणार आहे.