
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर तालुक्यातील मौजे बळेगाव येथील माजी सरपंच प्रतिनिधी गजानन विठ्ठल भुयारे हे ग्रामपंचायतीच्या मालकीचे सार्वजनिक बोअरवेल चे खाजगी घरगुती वापर करीत आहेत . आम्ही गावकरी मंडळीने यापूर्वी सरपंच सौ अर्चना दत्ता बेलदार यांना लेखी तक्रार दिलेली आहे . तरी ग्रामसेवक आणि सरपंच या वर गेल्या तीन महिन्यापासून कोणतेही कार्यवाही करीत नाहीत तरी आपण सदरील प्रकरणात लक्ष देऊन तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी . व बळेगाव येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा हि नम्र विनंती .
अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक ३० मार्च २०२२ पासून जिल्हा दंडाधिकारी कार्यालय देगलूर येथे गावकऱ्यांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे . तरी यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात यावे . हे गावातील समस्या न सोडविता त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत . आणि बोअरवेल साठी लागणारे सर्व साहित्य गावात आले असून ते बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक बोअरवेल साठी वैयक्तिक खर्च गजानन भुयारे यांनी केला असं सांगून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.
त्याच्या अश्या वागण्यामुळे समस्थ गावकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत . तरी मा गटविकास अधिकारी साहेबानी वेळीच सजग होऊन आपली कार्यवाही कायदेशीर रित्या अमलात आणावी आणि बळेगाव येथील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या सोडवावे. अशी विनंती करण्यात आली आहे . तसेच या विषयीचे निवेदन १) गट विकास अधिकारी देगलूर २)उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी देगलूर ३) तहसील कार्यालय देगलूर . ४) पोलीस निरीक्षक देगलूर .यांना देण्यात आले आहे .