
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- मा.निलाकांत जाधव सर यांची गोर सेना मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरूणभाऊ चव्हाण यांच्या हस्ते व प्राचार्य अरूण पवार सर यांच्या उपस्थितीत काल निलाकांत जाधव यांची एक मुखाने निवड करण्यात आली. गोर सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून १० वर्ष धुरा सांभाळनारे व अध्यक्ष असताना महाराष्ट्रात सर्वात मोठा अरक्षनासाठी मोर्चा त्यांच्या नेत्रवात काढण्यात आला होता. असे १० ते १२ वर्ष संघटनेत अहोरात्र काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते निलाकांत जाधव यांची ओळख आहे. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरूण भाऊ चव्हाण यांनी निलाकांत जाधव यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड केली आहे.
हजारो गोर सैनिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षांचे स्वागत केले. व शुभेच्छा दिल्या. सौ.साधनाताई अमोल जाधव (गोर सेना महीला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)प्रा.नारायण आडे (गोर सिकवाडी जिल्हा संयोजक परभणी), राठोड रमेश (दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी) ,बाळासाहेब आडे,इश्वर राठोड, शामराव राठोड,किरण राठोड ,राजूभाऊ राठोड,विकाश राठोड,बाळू राठोड,सचिन जाधव प्रदीप चव्हाण, संतोष राठोड, संतोष जाधव गोर सेना अहमदपूर ता .अध्यक्ष, समाधान चव्हाण, अनिल आडे, अजय जाधव, अनिल राठोड, अंबादास चव्हाण , रवी आडे व हजारो बंजारा समाज बांधव उपस्थित होते.