
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी पारनेर मध्ये एक आगळा वेगळा सोहळा तीर्थरूप श्री. महादु नारायण दाते आणि तीर्थरूप सौ. सोनाबाई महादू दाते यांचा सहस्त्र चंद्रदर्शन आणि अभिष्टचिंतन सोहळा तसेच टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील ८० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान सोहळा मणकर्णिका लॉन्स मंगल कार्यालय पारनेर येथे ह भ प गणेश महाराज वाघमारे (ओझरकर) कैवल्याचा पुतळा कथाकार यांचे सुश्राव्य कीर्तनाने संपन्न झाला. यावेळी १ हजार जेष्ठ स्री-पुरुषांना वस्रदान देवुन सन्मानित केले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दाते कुटुंबियांचे ज्येष्ठ सदस्य जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या संकल्पनेतून आपल्या आईवडिलांचा सोनियाचा दिनु आजि अमृते पाहिला ! या सोहळ्यानिमित्त माजी आमदार विजय औटी म्हणाले परमेश्वराने दिलेल्या आयुष्यातून उतराई होण्याचा प्रसंग खऱ्या अर्थाने आज दाते परिवाराच्या तिसऱ्या पिढीने डोळ्याने बघितले.अतिशय डोंगराळ भागात माणसाला जगण्यासाठी मूलभूत गरजा पाहिजे त्याही पुरेशा नाहीत असे खडतर आयुष्याची सुरुवात करणारे दाते सरांचे आई वडील एकत्रित आयुष्य जगण्याचा संघर्ष त्यांनी सुरू केला.
दिवसभर काबाडकष्ट केले नाही तर संध्याकाळची भाकरी मिळेल की नाही या परिस्थितीमध्ये कष्ट करत हे कुटुंब आज इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो त्यांच्याविषयी कृतज्ञता करायची ही भारतीय संस्कृतीचे हे अनोखे दृश्य आज पारनेरला बघायला मिळाले आहे. सार्वजनिक जीवनात गेली ४० वर्ष काम करणारे दाते सर ज्यांची चारित्र्यशील व्यक्ती म्हणून असलेली ओळख! आणि फक्त आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करताना टाकळीढोकेश्वर गटातील ज्येष्ठांचा सन्मान करायची कल्पना त्यांची या सर्व जेष्ठां बरोबर आई-वडिलांची सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करण्याची पारनेर तालुक्यातील अतिशय चांगली परंपरा दाते सरांनी सुरू केली.
त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि पारनेर तालुक्याला सार्वजनिक जीवनात, समाजकारणात उद्याच्या काळात दाते हे नाव अतिशय चांगले अक्षराने लिहिले जाईल! असे कृतज्ञता सोहळ्यात वेगळेपण आहे नवीन पिढीने याचा आदर्श घेणे गरजेचे आहे. हे संस्कार आहेत भविष्यात जे प्रत्येक कुटुंबाने पुढे नेणे गरजेचे आहे. घराघरांमध्ये छोट्या छोट्या कारणाने अडचणी निर्माण करणाऱ्या पाल्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा संदेश घेणे गरजेचे आहे.गुण्यागोविंदाने रहा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांचे अश्रू पुसण्याचे काम करा हा समाज तुमच्याबरोबर राहील हा संदेश तरुणांनी घ्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही परंपरा सुरू केल्याबद्दल दाते कुटुंबियांचे कौतुक करतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवाराचे ज्येष्ठ सदस्य जिल्हा परिषदेचे बांधकामव कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले.यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले कि मी माझ्या आई वडिलांची व चुलत्यांची अतिशय गरीब परिस्थिती पाहिली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवताना दुसऱ्यांच्या घरी सालानी राहून माझे शिक्षणासाठी कुटुंबासाठी काबाडकष्ट करावे लागले. त्यांना सहा सहा महिने ऊसतोड करण्यासाठी जावे लागत होते हे करत असताना माझ्या आईवडिलांनी आमच्या भावंडावरती अतिशय चांगले संस्कार केले.
वयाची शंभरी पूर्ण केली परंतु संपूर्ण जीवन शुद्ध शाकाहारी असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा पडल्या नाही.आज पर्यंत त्यांना दवाखान्यात जावे लागले नाही. अतिशय निरोगी आयुष्य त्यांचे आहे.लहानपणी जेव्हा त्यांच्याबरोबर शेतात औत-काठी करायला जायचो तेव्हा त्यांनी मला कधी शेतात काम करू दिले नाही एवढी दूरदृष्टी त्यांची होती की हा जर शेतात काम करण्यास लागला तर शिक्षण घेणार नाही, शाळा शिकणार नाही त्यामुळे त्यांनी मला शेतात काम करण्यास विरोध केला.कॉलेजच्या शिक्षणासाठी माझ्या चुलत्यांनी ही साले घातली आहेत असा हा आमचे चुलते आणि आमचा परिवार आणि हा माझ्या आई-वडिलांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करण्याचा आग्रह आमच्या चुलत्यांचा होता आणि माझ्या संकल्पनेतून मी हा सोहळा करण्याचे ठरवले की या निमित्ताने आमच्या सर्व नातेवाईक, सोयरे आणि आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट यांचे एकाच वेळी भेटीगाठी होतील.
यानिमित्ताने सर्वांचे एकत्र दर्शन होईल यानिमित्ताने टाकळीढोकेश्वर गटातील ८० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांचाही सन्मान करायचा. एकाच वेळी अन्नदान, वस्त्रदान करायचे कारण माझ्या वडिलांना लंगोटीवर राहावे लागले त्यातून उतराई होण्यासाठी ज्येष्ठांना वस्रदान करण्याचा संकल्प होता. आपण सर्वांनी या सोहळ्यास हजेरी लावली सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, नगराध्यक्ष विजू औटी, नगरसेवक युवराज पठारे, राजू शेख, नवनाथ सोबले, भाऊ ठुबे, ऋषी गंधाडे, कांतीलाल ठाणगे, दाते परिवारातील गोरख दाते, बबन दाते, गणपत दाते, सुभाष दाते, बाबासाहेब दाते,सौ. सीताबाई रोहोकले,सर्व नातवंडे, उपस्थित होते.सुत्रसंचलन उत्तम घोलप यांनी केले.