
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी शहरातील शिवसेनेच्या युवा फळीतील कर्तुत्ववान,कार्यतत्पर शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या उपदेशाला अनुसरून नेहमी अंजनगाव सुर्जीत समाजकार्यात तसेच राजकारणात चर्चेत राहणारा शिवसैनिक अक्षय गवळी यांची दुसऱ्यांदा युवा शहरअध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे,युवा सेना राष्ट्रीय सचिव वरून सरदेसाई,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, विभागीय सचिव सागर देशमुख,जिल्हा विस्तारक राजजी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धानोकार, उपजिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांच्या नेतृत्वाखाली अंजनगाव सुर्जी शहरप्रमुख पदी दुसऱ्यांदा नियुक्ती शिवसेना भवन मुंबई येथुन करण्यात आली.
अक्षय गवळी यांनी १२ वर्षाच्या कार्यकाळात रक्तदान चळवळ,रुग्णसेवा,शैक्षणिक कार्यक्रम,मेलघाट मध्ये जाऊन कपडे,दैनंदिन वस्तु वाटप,तसेच जनउपयोगी सामाजिक उपक्रम शहरांमध्ये चालू करून अंजनगाव शहरांमध्ये समाजसेवेचे व्रत हाती घेतले.याचेच फलश्रुती म्हणून मार्च २०१८ मध्ये सर्वप्रथम युवा सेनेच्या शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती.तेव्हापासुन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व पत्रकार सन्मान सोहळा राबवणे सुरू केले.तसेच कोरोना कार्यकाळात ३५० ते ४०० गरजू लोकांना संत गाडगेबाबा अन्नछत्र द्वारे ६० दिवस जेवण दिले.रक्त गरजवंत रुग्णांना वेळोवेळी रक्तपिशवी उपलब्ध करून देतात.
तसेच शहरांमध्ये आजुबाजूच्या पंचक्रोशीत कधि न झालेला असा महाआरोग्य शिबिर घेऊन एकाच दिवशी २३०० रुग्णांना तपासणी करून औषधोपचार करुन जवळपास २५० लोकांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क करून आणल्या. तसेच १२५ च्या जवळपास बाकी आजाराच्या शस्त्रक्रिया करून आणल्या. तसेच जनसामान्य नागरिकांचे अडचणी ची माहिती घेऊन त्यांचा अडचणी सोडविण्याचे काम व न्याय मिळवून द्यायचे काम करत असतात. त्यामुळे मोठा जनाधार त्यांच्याशी जोडलेला आहे हे विशेष त्यांच्या नियुक्तीचे श्रेय ते शिवसेना पदाधिकारी,ज्येष्ठ शिवसैनिक,युवासेना पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी,शिवसैनिक-युवासैनिक यांना देतात.