
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जगाच्या पाठीवर कोठेना कोठे शेजारी देशांमध्ये धुसफूस चालू असते. जसं गावातील शेजाऱ्याचं जमत नाही तसेच दोन शेजारी देशात काहीतरी कुरबूरी चालू राहातात. जगाचा न्याय आहे ‘बळी तो कान पिळी’. जसं मोठ्या वृक्षाखाली किंवा त्याच्या सावलीत दुसरे वृक्ष वाढू शकत नाही तसेच शक्तीमान शेजारी देशाजवळील राष्ट्र ही नेहमीच परावलंबी असतो नव्हे त्याला नेहमीच परावलंबी ठेवतात.
जगाने आतापर्यत विनाशक विध्वंशक दोन महायुद्ध पाहिली. पहिल्या पेक्षा दुसरे महायुद्ध जास्त हानीकारक होते. याच युद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोसिमा व नागासकी या शहारावर संहारक अनुबॉम्बचा वापर केला. सेंकदात होत्याचे नव्हते झाले. मित्रराष्ट्रानी युद्ध जिंकले तेव्हा पासून जगाची सरळसरळ दोन गटात विभागणी झाली. साम्यवादी रशियाचा गट व भांडवलवादी अमेरिकेचा गट.
या दोन्ही महायुद्धाची एक गंमत म्हणजे अमेरिका या युद्धात लवकर उतरली नाही. महायुद्धापासून अमेरिकेची भूमी खूप दूर व अलिप्त राहिली. त्यांच्या भूमीवर कधीच महायुद्ध लढलं गेलं नाही. पण अमेरिकेनी युरोपीय देशांना शस्त्रास्त्र पुरवाठा करून लोकशाहीचा उदोउदो करत त्या देशाला लंगोट लावून युद्धात उतरले. अमेरिका फक्त त्यांचे कपडे सांभाळत राहीला व युरोपीय देश रक्तबंबाळ होत भिकेला लागले. पुढे युद्ध थांबल पण जगाची सरळसरळ दोन गटात विभागणी झाली. सोवियेत युनियन विरुद्ध अमेरिका असे गट पडले. अमेरिकाला दोन्ही महायुद्धाची फारशी झळ लागली नव्हती. पण पैसा मात्र चिक्कार कमविला होता. त्या पैशावर अमेरिका युद्धसाहित्याची निर्मिती करून दुबळ्या देशांना विकण्यास सुखात केली. सोवियेत युनियनची भीती दाखवून सोवियेत रशिया विरोधात नाटो संघटनेची स्थापना केली. उद्देश एकच रशिया प्रबळ ठरू नये.
या संघटनेत त्यावेळी बारा देश समाविष्ट होते. नाटो सदस्यातील कोणत्याही एका राष्ट्रावर हाल्ला म्हणजे सर्वावर हल्ला समजून एकजूटीने संरक्षण करण्याचे ठरले. नंतर सोवियेत रशियाचे विघटन झाले. एकाचे रशिया सह सोळा भाग झाले भारता एवढा भूभाग रशियातून फुटून निघाला. खरंतर सोवियेत युनियनच्या भितीने नाटो संघटना ४ एप्रिल १९४९ रोजी स्थापन झाली होती. सोवियेत युनियनचे विघटन २६ डिंसेबर १९९१ रोजी झाल्यानंतर नाटो संघटनेची गरज नसतानाही अमेरिका प्रणित देश नाटोचा विस्तार करत राहीले. बारा सरस्याच देशांची असलेली नाटो संघटना तीस देशाची झाली. तरी अमेरिका सामाजिक, आर्थिक व राजकीय बाबतीत दुबळी बनत गेली. तथेती ही बेकारी वाढली. निद्रीस्त ड्रॅगन जागा झाला. तो अमेरिकेला ही धमकावण्याची प्रबळता ड्रॅगन मध्ये आली.
ड्रॅगन तोंडातून विस्तव ओकू लागला. त्यातच उत्तर कोरियाचं गुटगुटीत बाळ अमेरिकाच्या उरावर बसण्यास तयार झाला. अमेरिकेला आगदी अलीकडे आफगाणिस्तान मधून शेपटी घालून पळ काढावी लागली. यासाठी अमेरिका स्वतःची इभ्रत वाचवण्यासाठी बहाणा शोधत होता. त्यासाठी त्यांनी नाटो राष्ट्रांना हाताशी धरलं. नाटो राष्ट्रांत सर्वांत बिनडोक देश असेल तर ते ब्रिटन आहे. अमेरिकेच्या हो मध्ये हो हा मिसळत असतो. चागले वाईट काहीही न तपासता बिनडोकपणे ब्रिटन हा देश अमेरिका साथ देत असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बेकारांची संख्याही वाढलेली आहे. अर्थ व्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमेरिका बुद्धीबळाचा नवा डाव मांडला आहे. त्यासाठी प्यादा म्हणून युक्रेन या देशाचा सहज उपयोग त्यांनी करून घेत आहे.
अमेरिकेचे मांडलीक ब्रिटन, इटाली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, तुर्की व पोलंड ही राष्ट्रे अमेरिकेच्या अपमतलबी धोरणाला बळी पडत आहेत. अमेरिका नेहमीच युद्धापासून दूर राहून युरोपीय देशांना रशियाची भीती दाखवून स्वतःची आर्थिक पोतडी भरून घेत आहे. पण नाटो देशांना हे कळत नसावे का? या युद्धातून अमेरिकाला चिक्कार आर्थिक फायदा तर होत आहे पण त्याचा जानी दुष्मन रशियाला तो दुबळा बनवू पहातो. यात जो बायडन खूपचं आनंद घेत असावा पण जगासमोर एका महाशक्तीची महाशक्ती म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेची रशियाने आतपर्यंत तरी नाक कापलेली आहे हे निश्वित. खरं पाहता युक्रेन हा पूर्वीचा सोवियेत युनियनचा भाग. एक प्रगत भाग. त्याला जगातील गव्हाचे कोठार म्हणायचे सोवियेत रशियाच्या मोठमोठ्या अणुभट्या युक्रेन मध्ये.
रशियाचा एक प्रगत भाग. राष्ट्रराध्यक्षांचा आवडता प्रांत. परंतू बिचाऱ्याला कुठली दुर्बुधी सुचिली व तो अमेरिकेच्या नादी लागली. रशियाने खूप समजावूनही युक्रेन प्रियकर प्रियसी सारखी शपथ घेवून बापालाच धमकी देवू लागला. मी त्याच्याशीच लग्न करणार नाही तर मला तुम्ही फासावर लटकवा. बाप म्हणून रशियाने खूप समजाविले पण युक्रेन फार पुढे निघून गेला होता. तो पुरता अमेरिका व नाटोच्या नादी लागून पार बिघडून गेल्याचं रशियाच्या लक्षात आलं. मग मात्र रशियाने युक्रेनला पुरता धडा शिकविण्याचे ठरविले. त्यात अमेरिका नाटोच्या माध्यमातून आगीत तेल ओतत आहे. अमेरिका श्रीमंत होत आहे रशिया दुबळा बनत आहे तर युक्रेनची राखरांगोळी होत आहे. आता युक्रेनला इकडे आड तिकडे विहीर झालेली आहे. आडकित्यात सुपारी आडकल्या प्रमाणे आडकलेलं आहे.
जागतिक पातळीवर रशियाला एकांकी कोण पाडत आहे? रशियात युद्ध जिंकण्याची ताकत नाही? असा सर्रास प्रचार चालू आहे असा प्रचार करणारे हे पश्चिमात्य देश व त्यांचे पत्रकार, मेडीयावाले आहेत. रशियाच्या मनात आलं असतं युक्रेनची तर राखरांगोळी तेव्हाच केली असते. रशिया सामन्य नागरिकांना त्रास होवू नये जिवित हानी होवू नये म्हणून सावधपणे पण आक्रमक हाल्ले सैनिकी ठिकाणावर करत आहे; पण पश्चिमात्य देश रशियाला दुबळा मानत आहे असं करून ते रशियाला चेतावत राग भरवत आहेत. आक्रमक बनवत आहे. त्यांना युक्रेनची फिकिर नाही तमा नाही कसल्याच प्रकारची काळजी नाही. त्यांना फक्त रशियाला व पुतिन यांना युद्धखोर ठरवायचं आहे. रशियाच्या विरोधात मिडीयावाल्यांच एक तर्फी युद्धखोर राष्ट्र म्हणून प्रचार चालू आहे. कसा ते पहा :
एकदा एका जंगलातून सातजण प्रवास करत होते. सातपैकी एकाचे नाव भानुदेव होते .उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होतं. सताड रानातून हे सातही जन चालत होते. त्यांना तहान लागली होती. कुठेच पाण्याचा मागमूस दिसत नव्हतं. हे सातहीजण उच्चवर्णीय होते. पाणी कुठे मिळेल का म्हणून इकडे तिकडे नजर फिरवत होते. शेवटी त्यांना एक झोपडी दिसली. तेथे एक म्हातारी बसली होती. त्यांनी त्या आजीस जात विचारली. तिने जात सांगितली. ती सगळ्यात खालच्या वर्णची होती. यांना तर तहान लागाली होती. पाण्याविना जीव तळमळत होतं. सातपैकी सहाजण म्हणाले, जात कोणतीही असो आपण पाणी पिवू या. पण त्यातील एकजन कट्टर जातीवादी होता. त्याचे नाव भानुदेव होते. तो म्हणाला तुम्ही येथे पाणी पिलात तर मी आपल्या गावात जावून सांगेन. मग गाव तुमच्यावर बहिष्कार टाकतील. तुम्हाला गाव सोडावं लागेल.
पण ते सहाजन त्याचं ऐकले नाही. त्याला नजुमनता, परिणामाची पर्वा न करता त्यांनी मागस जातीच्या घरी पाणी पिले. भानुदेव फक्त एकटाच पिला नाही. मात्र तो यांना धमकावत होतं मी गावात सांगणार. त्यांनाही आता गावातील लोक काय शिक्षा करतील याची भीती वाटत होती. शेवटी सहाजणांनी विचार केला की गावात जावून भानूदेवने मागासवर्गीयांच्या घरी पाणी पिले आहे. आम्ही सहाहीजण त्याला पाणी पिऊ नको म्हणून विनंती केली; पण तो आमचं ऐकले नाही व तो बाटला आहे. गावात गेल्या बरोबर भानूदेवाने सर्व प्रसंग सांगितला पण हे सहाजण म्हणाले हा लबाड बोलतोय. याला आम्ही सर्वांनी खूप विनंती केली पण भानू ऐकला नाही व तो पाणी प्याला. आता गावाल्याला सहाजनांचं खरं वाटलं व गाव वाल्यांनी भानूदेवाला बहिष्कार टाकून गावातून हाकलून दिले.
सध्या रशियाचं खरं असून ही पाश्चिमात्त्य राष्ट्र रशियाला बदनाम करत आहे. असा कोणता देश आहे की पारंपारिक वैऱ्याला आपल्या सिमेवर किंवा छातीवर बसू देईल. रशिया भारताचा घनिष्ठ विश्वासू मित्र आहे. म्हणूनच भारत तटस्थ आहे. युक्रेनला विनाशाच्या खाईत कोण लोटत आहे? युक्रेन काही वर्षांपूर्वी रशियाचा लाडका मित्र होता. पण जोकर जेलस्कींच्या मोठेपणापायी. युक्रेनची राखरांगोळी करून घेत आहे. या जोकर माणसाला जर युक्रेनियन लोकांची काळजी राहिली असती तर तो नाटो देशांना शस्त्रास्त्र मागितले नसते. तर माझ्या लोकांचा जीव वाचवा युद्ध थांबवा म्हणून विनंती केली असती. याचना मागितली असती. हा हास्य कलकार, नकलाकार आहे. त्यामुळे याला चांगली नकलाकारांचीभूमिका वटवता येते. यांना सर्वांना हसवता येते. रडवता येते.
युक्रेन मध्येही रशियन आहेत. तेथे सहा माणसांपैकी एक माणूस रशियन भाषा बोलतो. त्यामुळे रशिया आतापर्यंत तेवढा क्रुर झालेला नाही. आणखी आक्रमकपणा दाखविलेला नाही असे माझे मत आहे. युक्रेनच्या राखरांगोळीला अमेरिका हाच सर्वांत जास्त जबाबदार आहे. अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करत आहे. अणु महायुद्धाला नाटो राष्ट्र जबाबदार रहाणार असे मला वाटते. तसं होऊ द्यायचं नसेल तर युक्रेनला सैनिकी मदत न करता तटस्थ भूमिका वटवून युद्ध थांबवावे. गंमत अशी आहे की दोन्ही देशांकडे सोवियेत संघाची शस्त्र, रणगाडे, विमानं आहेत. कोण कोणाचा रणगाडा भेदतो हे सांगता येत नाही. रशियाने त्यांच्या रणगाड्यावर ओ व झेड ही अक्षरी लिहीले आहेत. पण युक्रेनचा रणगाडा नष्ट झाला तर त्यावर वरील अक्षरे लिहून रशियाचं आम्ही खुप नुकसान केलं असेही युक्रेनला म्हणता येते. शेवटी युद्धात किमान ऐंशी ते नव्वद टक्के लबाड बोलता येते.
जेलस्कींकडे पाहून मला मेरा नाम जोकर हा चित्रपट आठवतो. या चित्रपटात राजकपूर (जोकर ) च्या जीवनात अनेक स्त्रीया येतात. प्रत्येक वेळी जोकरला वाटते की ही बाई माझ्यावर प्रेम करते पण शेवटी जोकरच्या जवळ कोणीही जात नाही. त्याच प्रमाणे अमेरिकेसह तीस देश जेलस्कींच्या प्रेमात पडल्यांचं ढोंग करत आहे. पण एकही मदतीला येत नाही. आता ‘जीना यहाँ मरणा यहाँ इसके शिवा जना कहॉ ‘ अशी गत युक्रेन राष्ट्राध्यक्षची झालेली आहे.
या युद्धात भारताची भुमिका काय आहे ?
भारत स्वतंत्र झाल्यापासुन आपला देश कोणत्या गट्बाजीत घुसलेला नाही. कोणाच्या तरी भितीने कोणा एका देशाची बाजू घेतलीली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जग सरळ सरळ दोन गटात विभागला गेला पण भारत अलिप्त राहिला. पंडीत नेहरू सरकार कोणासमोरही झुकले नाही. तीच परराष्ट्र निती आजपर्यंतच्या प्रधानमंत्र्यांनी कायम ठेवलेली आहे. सध्याचे आपले प्रधानमंत्री हेही कणखर बाण्याचे आहेत. परराष्ट्र धोरण राबवाताना ते कोठेच झुकलेले नाही. झुकणारही नाहीत भारतीय प्रधानमंत्र्यांच्या चालण्या बोलण्यातून त्यांची कृती सिद्ध होते. पंच्याहातर वर्षापूर्वी आखलेली परराष्ट्रनिती आजही प्रभावशाली ठरत आहे. सर्व जग भारताकडे, भारतीय प्रधानमंत्र्याकडे हे युद्ध मिटवा म्हणून मोठ्या आसेन पाहत आहेत. तर नाटोसोडून सर्व जग अमेरिकेची टर उडवत आहेत.
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६