
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
इंद्रसिंग वसावे
स्वच्छ व दर्जेदार मालाचा ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी सातत्याने सर्वांनी प्रयत्न करावे – श्रीमती मनिषा खत्री , मा . जिल्हाधिकारी , नंदुरबार
अक्कलकुवा :- काल दिनांक २९/०३/२०२२ रोजी मा . जिल्हाधिकारी सो, यांचे दालनात मिटींग झाली असता अन्न पदार्थांमध्ये भेसळ कशी ओळखावी यासाठी पुर्ण जिल्हयात जनजागृती व परवाना / नोदणी मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करावे . नंदुरबार जिल्हयात स्वच्छ व दर्जेदार मालाचा ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी जिल्हयातील अन्न आस्थापनेची तपासणी व अन्न नमुने घेणे या मध्ये सातत्य ठेऊन जनतेस निर्भेळ व शुध्द अन्न पदार्थ मिळणेकामी प्रशासनाने कामकाज करणे.
तसेच नंदुरबार जिल्हयात अन्न पदार्थाचा दर्जा गुणवत्तेबाबत वेळोवेळी जनजागृती करणे असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हयाचे मा . जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी केले . अन्न सुरक्षा व मानके कायादाअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत श्रीमती मनिषा खत्री , अध्यक्ष पदावरुन बोलत होत्या . बैठकीसाठी पोलिस विभागाचे प्रतिनिधी , मा जिल्हा आरोग्य अधिकारी , अन्न व नागरी पुरवठा अधिकारी यांचे प्रतिनिधी , मा . जनरल मॅनेजर डी आय . सी . आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक भाषण करतांना अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त ( अन्न ) श्री संतोष कांबळे यांनी सांगितले की , मागील वर्षात आम्ही रु .२६,५०० / – दंड वसुल केलेला असुन अन्न आस्थापन्यांचे जास्तीत जास्त तपासण्या करुन भेसळ करण्या – यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे , तसेच समितीच्या सदस्याचे कार्य त्यांनी विषद केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्र सुरक्षा अधिकारी श्री आ.भा. पवार, समाधान बारी, प्रदिप वळवी,यांनी सहकार्य केले.