
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
लोहा :- लोहा येथील भाजपा तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी सांगूनही पक्ष संघटन वाढवले नाही.म्हणूनच त्यांची पदावरून पक्षाने हक्कालपटी केली. भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षामध्ये सक्षम असलेले लोहा तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे यांची तालुका भाजपा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली त्यांचे संघटन कौशल्य नेतृत्व व ग्रामीण भागातील पकड मजबूत आहे निर्भिड व्यक्तिमत्व आनंदराव शिंदे भाजपा तालुकाध्यक्ष पदावर नियुक्त झालेले आहेत.
तसेच शरद पवार हे वेळोवेळी सांगूनही त्यांनी पक्षामध्ये व्यवस्थित राहिले नाहीत. तसेच लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदी सोडायला तयार नव्हते ,त्यामुळे लोह्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी पीठासन अधिकारी व सर्व नगरसेवकांच्या मदतीने शरद पवारवर अविश्वास ठराव दाखल करून , उपनगराध्यक्षपदावरूनही हकालपट्टी केलेली आहे .शरद पवार यांना वेळोवेळी सांगूनही उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही त्यामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे .अशा पद्धतीने शरद पवार दोन्ही पदावरून पायउतार झाले.
प्रविण पाटील चिखलीकर साहेब यांची व्युहरचना यशस्वी झाली आहे.यावरून भाजप पक्षामध्ये शिस्त,संघटन व नेतृत्व या गुणाला वाव आहे आणि खरोखरच आहे , श ग्रामीण भागातील एक होतकरू, प्रामाणिक, युवा कार्यकर्ता, आनंदराव पाटील शिंदे हे या पदावर आले आणि ढाकणीला पुन्हा एकदा तालुका स्तरीय भाजपा तालुकाध्यक्ष पदाची प्राप्ती झाली आनंदराव पाटील शिंदे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, व भारतीय जनता पक्ष कमिटी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथून पुढचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडतील व ग्रामीण व शहरी भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहेत .