
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- आज मौजे भाकरवाडी ता.चाकूर येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकार होत असलेल्या विठ्ठल रुक्मीणी मंदीराचे भूमिपूजन अहमदपूर चाकूरचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री उत्तमराव वाघ यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या बांधकामासाठी स्वतः५१ हजार रुपयांची देणगी दिली.यावेळी त्यांचा गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते गणपतराव नितळे, मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष देविदास माने, आबासाहेब माने , अंकुश बोमदरे,ॲड हाके, विष्णूकांत गडदे,शिवाजी हाके,बालाजी तुडमे,नंदकुमार हाके,चंद्रकांत गडदे,अण्णाराव हाके,माधव गडदे,अंबादास तुडमे,सुधाकर वाघमोडे,दयानंद गडदे,शञुघ्न गडदे,गोपाळ गडदे,ज्ञानेश्वर हाके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.