
दैनिक चालु वार्ता
परतुर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- कॉग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदनीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असुन जालना जिल्हयात परतुर मतदारसंघात मा. आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नोंदनी अवल्ल स्थानावर असल्याबददल औरगांबाद महानगर पालीकेचे विरोधीपक्ष नेते तथा महाराष्ट्रप्रदेश कॉग्रेस सरचिटनिस डॉ.जफर अहमद खान यांनी कौत्युक व्यक्त केले. दिनांक 29 मार्च 2022 रोजी कॉगेसच्या डिजिटल सदस्य नोंदी अभियान अर्तगत परतुर येथे सपंन्न झालेल्या कॉग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पअध्यक्ष म्हणून मा. आ. सुरेशकुमार जेथलिया तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्वरबापु देशमुख, किसान कॉग्रेसचे प्रदेश सचिव अहेमद पटेल, साहेबराव बनकर, कॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, इद्रजित घनवट, सादेकबापु देषमुख, अविनाष शाहणे, अजिज सौदागर, अयुब कुरेशी, सिदार्थ बंड, प्रविण डुकरे, शाकेर मापेगावकर, अशोक तरासे, आंनता भारसाखळे, बापुराव दुगाने, विष्वनाथ खरात, बाबासाहेब पाटिल, नारायण भिसे, मुस्ताख शेख, राजु पवार, गोपाळ मरळ, बाबुराव दुगाने, अशोक खरात, सुनिल सदावर्ते, सनि गायकवाड यांची उपस्तीती होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ.जफर अहमद खान यांनी म्हटले की, कॉग्रेसचे प्रदेष अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संबध राज्यभर कॉग्रेस डिजीटल संदस्य नोंदी अभियान राबवले जात असुन या मागचे एकच कारण की, पक्षात काम करणा-या कार्यकर्त्योची वरिष्ठांकडून दखल घेतली जावी व डिजीटल माहितीव्दारे कार्यकर्त्योंशी वरिष्ठ नेत्यांचा दैनदीन संर्पक राहावा व पक्षाच्या कार्यक्रमाची वेळोवेळी एकाचं वेळी सर्व नेते व कार्यकर्त्योंना माहिती मिळावी हा उददेश समोर ठेवुन हे अभियान राबवण्यात आले असुन जालना जिल्हात परतुर मतदारसंघात कॉग्रेसच्या कार्यकर्त्योनी या निमीत्ताने चांगली कामगीरी बजावली असल्याचे बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .
या अभियानाला चारचं दिवस शिल्लक राहिले असुन कार्यकर्त्योंनी अजुन झटुन सदस्य नोंदनी करत मराठवाडयात मोठी कामगीरी बजवावी असे आहवन त्यांनी यावेळी केले. दरम्यान आपल्या मनोगतात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, कॉग्रेसचे ध्येय धोरणे सर्वससामान्यांना सोबत घउन चालणारी असुन सर्व जाती धर्माला सोबत घेउन चालनारा कॉग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. अलिकडे चार राज्याच्या निकालात भजपाने जरी सरसी केली असली तरी उत्तर प्रदेश निवडणुक निकालाचा सर्वे केला असता. शंभरांच्या वर कॉग्रेसचे उमेदवारांचा केवळ हजाराच्या फरकाने तर कुठे अत्यंत कमी फरकाने पराभव झाला असल्याचे ते म्हणाले.
भविष्यात कॉगेस हे अंतर मोडत पुन्हा राज्यासह देशात सत्तेत येईल अशी शेवटी त्यांनी शा व्यक्त केली. दरम्यान यावेळी आपल्या प्रस्ताविकात बाबासाहेब गाडगे यांनी म्हटले की, आमच्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या आम्ही पार पाडत असुन तालुक्यात कॉग्रेसचे बळ वाढवण्यासाठी डिजीटल सदस्य नोंदनीला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणाले. या बैठकीचे सु़त्रसंचालन इद्रजित घनवट यांनी तर आभार मतिन कुरेशी यांनी मानले. यावेळी मोठयासंखेने कॉग्रेस कार्यकर्त्योची उपस्तीती होती.