
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.३१.पंचवटी मध्ये डी.एड काॅलेज समोर प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रदिप बावस्कार, डहाके यांच्या घरापासून ते जगन्नाथ बऱ्हाटे यांच्या घरासमोर नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ संजय मेहश्रे यांनी नगरपरिषद नांदुरा यांना कळविले असता त्यांनी सदर बांधकाम हे नगरपरिषद अंतर्गत सुरू नसून ते सा. बां. विभाग खामगाव यांच्या मार्फत सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.
त्या नंतर संजय मेहश्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना निवेदन देऊन सदर नालीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे व या बांधकामावर आपल्या कुठल्याही अभियंत्यांनी पाहणी केली नाही, त्यामुळे आपल्या निगराणीत मध्ये सदर नाली बांधकाम व्हायला पाहिजे. या बांधकामाचे फोटो व व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहेत, तरी आपण सदर कामाची पाहणी करून चांगले काम करुन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. व संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी जेणे करून पुन्हा असे कृत्य कुठलाही ठेकेदार किंवा अधिकारी करनार नाही.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्या नांदुरा तालुक्यातील अशा अनेक प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहे तरीसुद्धा या कंत्राटी ठेकेदारांवर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही, आणि कार्यकारी अभियंता खामगाव यांच्या जवळचे ठेकेदार यांना ठेके देण्यात येते अशा कामावरून दिसून येत आहे,तर सर्व सामान्य जनतेने न्याय कुठे मागावा,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा व सार्वजनिक बांधकाम विभाग मलकापूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.