
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- येथील आई प्रतिष्ठानतर्फे येत्या १५ एप्रिल रोजी मालेगावात राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी विनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. संम `लनाचे उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांचे हस्ते होणार असून सामाजिक कार्यकर्ते संजय फतनानी स्वागताध्यक्ष असल्याची माहिती आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी दिली. मालेगावात तब्बल २२ वर्षांनंतर साहित्याचा उत्सव होणार आहे. कॅम्पातील स्टॉर कलब मैदानावर कुसुमाग्रज साहित्य नगरीत पाच सत्रात हे संमेलन पार पडणार आहे.
संमेलन सभामंडपास वैजनाथराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनास प्रम ख अतिथी म्हणून खा. डॉ. सुभाष भामरे, आ. डॉ. सुधीर तांबे, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महापौर ताहेरा शेख, उपम हापौर नीलेश आहेर, मामको चेअरमन राजेंद्र भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मनपा गटनेते सुनील गायकवाड, बाराबलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, व पं.स. सभापती सुवर्णा देसाई, उपसभापती सरला शेळके, शिल्पा देशम ख आदी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, चित्रप्रदर्शन, आदी भरगच्च उपक्रम नियोजित केले आहेत. याशिवाय बदलते ग्राम, कृषीजीवन आणि मराठी कविता’ या विषयांवर परिसंवाद, चित्रकार व लेखक सरदार जाधव यांची प्रकट मुलाखत तसेच कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक साहित्यिकांना कसमादे साहित्य भूषण पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा कुसुमाग्रज पुरस्कार कै. अभिमन कदम पुरस्कार, कै. भालेराव पाटील पुरस्कार, कै. सुकेदव शेवाळे पुरस्कार, कै. कुसमताई सुर्यवंशी पुरस्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार, कै. सखुबाई पवार पुरस्कार वितरण करण्यात येतील संम `लनाच्या नियोजनासाठी विविध संस्था परिश्रम घेत आहेत.