
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधि
मोहन आखाडे
औरंगाबाद :- गुटखा विक्रेत्यावर गुन्हे शाखेचा छापा टाकून सव्वा चार लाख रूपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखु जप्त केली. ही कारवाई दौलताबाद येथे करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २९/०३ /२०२२ रोजी गुन्हे शाखेला माहीती मिळाली की, सय्यद अजिम सय्यद युनूस (वय ४२ वर्षे रा. भीमनगर, दौलताबाद, ता.जि. औरंगाबाद) याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पान मसाला, सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा त्याचे राजवाडा, दौलताबाद येथील घरात अवैधरित्या विक्री करण्यासाठी बेकायदेशिररित्या साठा करून ठेवला आहे.
सदर ठिकाणी छापा मारून कारवाई करणे करिता मिळालेली माहीती अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना फोन द्वारे देवून त्यांना सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी सोबत येणे बाबत विनंती केली परंतु त्यांनी सदर कारवाईसाठी पोलीसांना अधिकार असले बाबत कळवून कारवाई करिता येण्यास नकार दिला. त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पथकासह मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जावून छापा मारण्याचे नियोजन केले.
सदर ठिकाणी जावून छापा मारला असता एकूण ४,२४,५१५ / – रु किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला , वि -१ तंबाखु , प्रियीयम राज निवास सुगंधीत पान मसाला , प्रियीयम एक्स एल ०१ जाफरानी जर्दा , हिरा पान मसाला , रोयॉल ७१७ तंबाखु , केसर युक्त गोवा १००० असा गुटखा , पान मसाला व सुगंधीत तंबाखु जप्त केला. आरोपीविरोधात पो.ठाणे दौलताबाद येथे गुन्हा दाखल केला.
हि कामगिरी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके , सफौ / रमाकांत पटारे , पोह / विजय निकम , पोना / राजेंद्र साळुंके , नितीन धुळे , पोअं / संदीप सानप , मपोअं / अनिता त्रिभुवन यांनी केली.