
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
“मी गेली ५० वर्षापासुन फुले, शाहु,आंबेडकर चळवळीत सातत्याने अन्याय,अत्याचाराविरूध्द बंड करून विविध प्रकारचे, मोर्चे, धरणे,आंदोलने,विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत मी केलेल्या सामाजिक,राजकिय, कार्याचा गौरव म्हणून आज मला पुणे येथील यशदा च्या माध्यमातून “रत्नधाव फाउंडेशन, महालँन्ड ग्रुप तथा दुबई येथील सफर संस्थेच्या माध्यमातून मिळालेला जिवनगौरव पुरस्कार म्हणजे जणू माझं सौभाग्य च आहे. हा जिवन गौरव पुरस्कार प्रथमतः मी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी वाहतो आणि खरचं आज मी खुप भारावून गेलो.
मी कधीही असा विचार ही नाही केला की, मला दुबई सारख्या विदेशामध्ये जिवन गौरव पुरस्कार मिळेल. खरचं आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस आहे असे मी समजतो ही केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. आयु.दशरथराव लोहबंदे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते – जि.प.सदस्य,नांदेड
गेल्या पन्नास वर्षापासून अविरत आंबेडकरी चळवळीत काम करणारे,दलित समाजासाठी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देणारे सामाजिक कार्यासह सांस्कृतिक व धार्मिक, राजकारण, क्रीडा यात सक्रिय सहभाग घेणारे जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे हे त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल दुबई येथील सफर संस्थेच्या जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित.
रत्नधाव फाउंडेशन व महालँड ग्रुप त्याचबरोबर दुबई येथील सफर संस्थेच्यावतीने दुबई येथे दि.२९ मार्च रोजी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही व्यक्तींसह मुखेड तालुक्यातील आयु. दशरथराव लोहबंदे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मुखेड तालुक्याचे व मराठवाड्याचे आंबेडकरी चळवळीचे दलित नेते जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे हे सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक ,राजकीय ,क्रीडा यासह विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयु.दशरथराव लोहबंदे हे पुणे येथून रात्रीला मुखेड ला रवाना होणार आहेत. दि.३१ मार्च रोजी मुखेड तालुक्यातील जांब (बु) येथून भव्य नागरी सत्कार व मोटार सायकल रॅलीने मुखेड शहरात आगमन होणार आहे. आगमनानंतर दुपारी दोन वाजता मुखेड शहरात जंगी स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.