
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे ३१मार्च :- संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदार धरू लागलीय. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेता बदला बाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधी आघाडीचा नेता कोण पाहिजे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यावर काही बोलणार नाही.
परंतु आमची भाजपाची देशभर संघटन बांधणी व जनसंपर्क मोहिम जोरदार चालू आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी देशामध्ये २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. लोकशाही पध्दतीने देश यशस्वीपणे चालविण्यास कोण सक्षम आहे हे जनता चांगलीच ओळखून आहे.