
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला व गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तळेमाऊली मंदिर परिसरात पाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वारकरी बांधव टाळ मृदंगाच्या तालावर विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनीही सहभागी होऊन, विठूराया घ्या नामाचा जयघोष केला.