
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कोल्हापूर
संभाजी गोसावी
कोल्हापूर :- संगमनेर तालुक्यांचे भूषण समाज प्रबोधन ह .भ .प जयश्रीताई महाराज तिकांडे यांना सद्गुरु बाळूमामा फौडेशन अमदमापुर आदर्श सद्गुरु बाळूमामा श्री .आध्यात्मिक सेवा पुरस्काराने गौरविण्यांत आले. किर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम जे आपण लीलया हाताळले आणि महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यापर्यंत संत विचार प्रभावीपणे मांडले आधुनिक जगाच्या पटलावर नव विचारांच्या झालरी लावून आपण करत असलेले हे कार्य निश्चितच आजच्या समाजाला प्रेरणा देणारे आहे_नाचू कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू जगी या पंक्तीप्रमाणे आपण ज्ञानाचे हे ठसे सर्वत्र उमटवले.
कोरोना काळात आपण सद्गुरु बाळूमामांच्या बकऱ्यांच्या तळावर जाऊन कीर्तन रूपांने केलेले ज्ञान दानांचे कार्य प्रत्येकांचे मनोबल वाढविणारे ठरले म्हणूनच ते निश्चिंतच आमच्यासह सर्वांनांच प्रेरणादायी आहे. आम्हां सर्वांची भगिनी म्हणून आपल्या कार्याला आमचा मनोमन सलाम याची पोचपावती म्हणून आमच्या सद्गुरु बाळूमामा विकास फौडेशन च्या वतीने आपणांस बाळूमामा श्री. आध्यात्मिक सेवा पुरस्काराने गौरविण्यांत येत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती खजिनदार महादेव पाटील, सचिव संताप्पा पाटील , उपाध्यक्ष प्रकाश खापरे , अध्यक्ष विजयराव गुरव तसेच बाळूमामा देवस्थानांचे सेवकरी यांच्या उपस्थिंतीत समाज प्रबोधन ह .भ .प जयश्रीताई तिकांडे यांना गौरविण्यांत आले.