
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा RRR या चित्रपटामध्ये झळकले आहेत. परंतु त्यांचेदेखील काही सीन्स कट झाल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
अभिनेत्री आलिया भट्टच्या करियरमधील पहिल्या टॉलिवूड चित्रपटातील सीन्स कट झाल्यामुळे ती नाराज असल्याची चर्चा होती. एस.एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात तिने सीता ही व्यक्तीरेखा साकारली.
ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा आहे. मात्र त्यांचेदेखील ह्या चित्रपटातून सीन्स कट झाल्याचं त्यांने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले. RRR मध्ये मकरंद देशपांडेनी साकारलेली भूमिका ही खूपच छोटी आहे. तरीसुद्धा ती स्वीकारण्यामागे कारण काय होतं, याबद्दलही त्यांनी सांगितले. मकरंद यांनी आतापर्यंत ‘सत्या’, ‘जंगल’, ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.