
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जूनचा’पुष्षा-द राइज’ सिनेमानं बॉक्सऑफिसवर जेवढी आपली जादू दाखवली तितकंच सोशल मीडियावरही साऱ्यांना आपल्या प्रेमाचं वेड लावलं होतं. सिनेमातील संवादांपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींवर अनेक रील्सचा खच सोशल मीडियावर पडलेला आपण साऱ्यांनीच पाहिला असेल. सिनेमातील मुख्य कलाकार अल्लु अर्जून आणि रश्मिका मंदाना यांच्यावर तर चाहते फिदाच झालेयत. आता तर सिनेमातील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाच्या फॅनलिस्टमध्ये दस्तुरखुद्द बॉलीवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांचाही समावेश झाला आहे.
अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रश्मिका मंदानासोबतचा एक फोटो शेअर करीत त्याला कॅप्शन दिलं आहे की,”पुष्पा!” तर रश्मिकानं यावर प्रतिक्रिया देताना लिहिलंय ,”सर,हम झुकेगा नही”. ऱश्मिकाच्या या उत्तराने मात्र चाहत्यांनी अमिताभ यांची मस्करी केली आहे. रश्मिकानं उलट उत्तर दिलं म्हणून अमिताभ यांना आता वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. सिनेमातला हा पंच डायलॉग खूपच व्हायरल झाला होता. जिथे पुष्पाच्या भूमिकेतला अल्लू अर्जुन एका विशिष्ट हावभावात ही संवादफेक करताना म्हणतो कसा,”नाम से फ्लॉवर समझे क्या, फायर है,मैं झुकेगा नही’. या सीनवर खूप मीम आणि इन्स्टाग्राम रील्स बनले होते. रश्मिकानं सिनेमात श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली होती.