दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील मुख्य रस्ते व गावाला जोडणारे रस्ते बहुतांश सगळे रस्ते खराब अवस्थेत आहेत त्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी तसेच दर्जेदार रस्ते व्हावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी भूम यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
या वेळी भूम तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रुपेश शेंडगे,माजी नगरसेवक रोहन जाधव ,माजी नगरसेवक सोपान वरवडे,भूम तालुका सेवादल तालुका अध्यक्ष बिभीषण टाळके,वाकवड ग्रा उपसरपंच बादशहा शेख,उस्मानाबाद जिला युवक काँग्रेस सरचिटणीस अण्णा महानवर,विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष धनाजी सोनवणे, विधानसभा युवक काँगेस सरचिटणीस अमित पाटील, विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस विकिन मिसाळ, मा विधानसभा सरचिटणीस अमर बादेला,सचिन वाघ,विध्यर्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष सिद्धर्थ जाधव, विध्यर्थी काँग्रेस शहराध्यक्ष ओम पाकले, अरुण क्षीरसागर, कार्यकर्ते उपस्थित होते.