
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नागपूर :- ईडीने वकील सतिश उके यांच्यावर कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण निमगडे प्रकरण आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके यांच्या घरावर छापा टाकला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘ही धाड मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आली आहे.
नागपूरमध्येही ईडीचे कार्यालय आहे. मात्र, त्यांना या सर्वांचा पत्ताही नव्हता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्याकडील फाईल्स आणि त्यांचा मोबाईल जप्त केला. या फाईल्समध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आहे. मात्र, ईडीचा गैरवापर करून या फाईल्स जप्त केल्या आहेत. असं पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीकास्च्र सोडलं आहे.