
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी ता.कोरेगाव
संभाजी गोसावी
कोरेगाव :- करंजखोप गावचे नूतन पोलीस पाटील पदी विनोद मारुती वरर्पे यांची नियुक्ती करण्यांत आली. करंजखोप ता. कोरेगाव रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदावर सरळसेवेने नियुक्तीसांठी अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज मागविण्यांत आले होते. यात अर्जाच्या पात्रतेनुसार घेण्यांत आलेल्या लेखी तोंडी परीक्षेच्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यांत आलेल्या अंतिम गुणवत्तानुसार विनोद वरर्पे यांनी सर्वोच्च गुण मिळवल्यांने त्यांची पोलीस पाटील पदासांठी निवड करण्यांत आली. त्याबद्दल विनोद वरर्पे यांचे आमदार मा. दीपकजी चव्हाण साहेब तसेच कृषी सभापती सन्माननींय मंगेश दादा धुमाळ यांच्यासह करंजखोप ग्रामस्थांकडूंन त्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील सेवेसांठी शुभेच्छा व्यक्त करण्यांत आल्या.