
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पाच राज्यांच्या मिनी लोकसभा निवडणुका संपताच राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या होणार आहेत. जवळपास ७२ राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. यापैकी अनेकांना पुन्हा सदस्य होता येणार नाही, तर काहीजण पुन्हा सदस्य होऊ शकतात. त्या त्या राज्यातील कोट्यानुसार, राजकीय परिस्थितीनुसार या जागा जिंकल्या जाणार आहेत.
आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सदस्यांना आज निरोप दिला. आज राज्यसभेत शून्य प्रहर किंवा प्रश्नकाळ होणार नाही, यामुळे विविध पक्षांचे नेते, सदस्य या निरोप समारंभात बोलू शकणार आहेत.