
दैनिक चालु वार्ता
सातारा प्रतिनिधी
संभाजी गोसावी
सातारा :- सातारा विना हेल्मेट मुळे अलीकडे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यांमुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना आता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकाद्वारे दिली. वाहन अपघातामध्ये दगवणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे 70 टक्के व्यक्तींचा दुचाकी वाहन पदचारी आणि सायकलस्वांर असतात. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकांच्या अपघातात मृत्यू येण्यांचा धोका सातपर जास्त असतो.
दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात होणाऱ्या व्यक्ती मध्ये सुमारे 70 टक्के व्यक्तींचा दुचाकी वाहन पदचारी यांनी सायकलस्वार असतात. कार चालकांच्या यांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्यांचा धोका सातपर जास्त असतो. जितके दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात दगावतात त्यापैकी सुमारे 62 टक्के व्यक्तींना डोक्यांला इजा झाल्यांमुळे मृत्यू ओढवला गेला आहे . मोटार वाहन कायद्यांनुसार चार वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे .
जिल्ह्यांतील शासकीय ,कार्यालय महामंडळे, नगरपालिका सर्व शाळा, कॉलेज तसेच सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरताना हेल्मेट घातले नसल्यांस संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. असा आदेश जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी जारी केला आहे.