
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- केंद्रशाळा रिसनगाव अंतर्गत जिल्हा परिषद शाळा हुलेवाडी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली. शालेय व्यवस्थापन व शाळेच्या विकासासाठी ही समिती महत्त्वाची आहे. आज अनेक जणांच्या उपस्थितीत ही निवडणूक अतीशय शांत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास हाके याची तर हरी सुरनर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून तुकाराम हाके, सौ.सोजर नवनाथ वाघमोडे, सौ.जयश्री माधव वाघमोडे,सौ.रंजना गणपती डोंबाळे,विक्रम मुकनर, शिवाजी वाघमोडे, मारोती पोले इत्यादींची निवड करण्यात आली.
शिक्षक प्रतिनिधी मारोती कारेगावकर तर समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक गोविंद जायेभाये सर यांची निवड करण्यात आली तसेच शिक्षण प्रिय सदस्य म्हणून विनायक कोपनर यांची निवड करण्यात आली. यावेळी सावरगाव नसरतचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद कोपनर यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी शाळेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.