
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मंठा दि १ :- परतूर-मंठा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दलित समाजा विरुद्ध अपशब्द वापरले या विरोधात आज शुक्रवार रोजी पोलिस निरीक्षक संजय देशमुख साहेब व तहसिल कार्यालय मंठा येथे जय-भीम सेनेने निवेदन दिले. या निवेदनाद्वारे आमदार बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथील सातारा परिसरातील त्यांच्या बंगल्याची महावितरणाचे विजेचे मीटर काढल्यामुळे त्यांनी अभियंता दादासाहेब काळे यांना धमकी दिली. दलित वस्तीवर कार्यवाही करून दाखव असे अनुसुचित जाती-जमाती विरुद्ध अपशब्द वापरले. आमदार मगरूरपणे बोलून समाजांत तेढ पसरविण्याची भाषा वापरत होते. त्यामुळे त्यांना 1989 अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी जय भीम सेनेने मागणी केली.
नसता तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा जय भीम सेनेने दिला. या प्रसंगी जय भीम सेनेचे ता अध्यक्ष उद्धवभाई सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वाघ, ता.युवक अध्यक्ष सिद्धार्थ देशमाने, शहर अध्यक्ष पिराजी पवळे,ता.,युवक उपाध्यक्ष मिलिंद देशमाने, युवक शहर अध्यक्ष राजेश खनपटे,ता.सचिव बाबासाहेब डंबाळे, नगरसेवक राजेश खंदारे,लोकनेते बाळासाहेब वांजोळकर, मोईन कुरेशी,नरेंद्र वाघमारे, नितीन वाघमारे, रघुवीर जाधव, सचिन वाघमारे, गणेश वाघमारे, राजेश खनपटे,आर्जून कांबळे, तुकाराम येळे, सुरेश बनसोडे,बाळेराज वाटुडे, प्रकाश वाटुडे, राजुल वाघमारे, सुंदर प्रधान,शबाब बागवान, रामेश्वर मोरे,सुनिल खंनपटे,अविनाश मोरे,राजु वाटुरे,व बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थिति होते.