
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
बुलडाणा :- दि.१ वंचित बहुजन आघाडी प्रमुख श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात बुलडाणा तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष संदीप लहाने यांची पक्षा प्रती असलेली काम करण्याची चिकाटी व बहुजन समाज जोडण्याची भुमिकेमुळे त्यांना तालुका अध्यक्ष हे पद देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकारी यामध्ये तालुका अध्यक्ष पदी संदीप लहाने तर उपाध्यक्ष- विजय सपकाळ, मोहन मोरे, महासचिव- प्रशांत गवई, आत्माराम चवरे, संघटक- आकाश हिवाळे, संतोष जाधव, प्रवक्ता- नामदेव इंगळे, सचिव- अण्णासाहेब मिसाळ, निलेश जाधव, आनंदा खरे, राजु सुरडकर, सदस्य- आकाश जाधव, भिमराव डावकर, राजधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.