
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना :- तालुक्यातील मौजा सावलहिरा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व सल्लाशक्तीचे उदघाट्न संपन्न झाले.
गावातून रॅली काढत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे व सल्लाशक्तीचे उदघाट्न माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिवती नगरपंचायत नगरसेविका सतलूबाई जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य झिबलपाटील जुमनाके, मंचावर जिवती नगरपंचायतच्या नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, ग्रामआरोग्य सेना फॉउंडेशन चे संस्थापक डॉ. प्रवीण येरमे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुकाध्यक्ष मेजर बंडुजी कुमरे, मेजर किन्नाके, सामाजिक कार्यकर्ते अरुण मडावी, येल्लापूरचे सरपंच सोनेराव पेंदोर, सामाजिक कार्यकर्ते संजयजी सोयाम, मूर्तिकार लक्ष्मण कुळसंगे, डॉ. सफल कोटनाके, विमलबाई कोटनाके उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावलहिरा येथील समाजबांधवांनी परिश्रम घेतले.