
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- हादगाव येथील तामसा रोड वरील अतिक्रमण त्वरित काढणे बाबत जय संघर्ष वाहन चालक, चालक – मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर व हादगाव तालुका अध्यक्ष श्री नारायण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१ मार्च २०२२ रोजी संघटनेचे हादगाव तालुका उपाध्यक्ष श्री नाजिम शेख व इतर सहकारी चालकांच्या वतीने तहसील कार्यालय हादगाव यांना निवेदन देण्यात आले. हादगाव शहरातील सर्व प्रवासी वाहतूक करणारी वाहने मागील २५ ते ३० वर्षा पासून तामसा रोडवर आसणार्या जागेवर आपली वाहने थांबवून बाहेरगावी जाणार्या प्रवाशांना सेवा पुरवून परिवाराचा उदर निर्वाह करतात.
परंतु काहि दिवसा पासून तेथे आसणार्या नाल्यावर काहि लोकांनी बेकायदा अतिक्रमण करूण दुकाने थाटण्याचा सपाटा चालू केलेला आहे. त्या मुळे आमची वाहने आम्हाला ऊभी करण्यास तसेच ये-जा करणार्या रहदारीस पण अडथळा निर्माण होत आहे.
आशा आशयाचे निवेदन वाहन चालकांच्या वतीने हादगाव येथील तहसीलदार साहेब यांना देण्यात आले तसेच मा. उपविभागीय अधिकारी हादगाव,मा.पोलीस उपनिरीक्षक साहेब हादगाव, मा. उपअभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग हादगाव आणि मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद हादगाव यांना पण माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे.
जर सदरचे अतिक्रमीत दुकाने त्वरित हटवली गेली नाहित तर जय संघर्ष वाहन चालक,चालक – मालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल आसा इशारा निवेदना ध्दारे संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सदरच्या निवेदनावर खालील वाहन चालकांच्या सह्या आहेत. प्रदिप कदम,प्रमोद शिंदे,किशोर भादुरे,पप्पू शेख,नशिर शेख,गोपाल शिंदे,अजित इंगोले,विठ्ठल कदम,बबलू शिंदे,दत्ता निर्मळ,देवानंद चव्हाण,ओंकार वाघमारे,गजानन चव्हाण, शेख मोहसिन,सोनू बेलके,शिवाजी सूर्यवंशी,एकनाथ मोरे,राजू सावतकर, नितिन काळे, संजय गोविंद आणि मोनू इंगोले. इत्यादिंच्या निवेदनावर सह्या आहेत.