
दैनिक चालु वार्ता
वाडा प्रतिनिधी
मनिषा भालेराव
वाडा प्रतिनिधी :- दि. (३१/०३/२०२२) रोजी डाकिवली फाटा येथे डाकिवली- चांबळे- लोहपे- नेवालपाडा- केळठण रोड संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. हा रस्ता व्हावा म्हणुन येथील नागरीकांनी अनेकदा निवेदने दिलेत परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग येत नाही , खरोखरच या रस्त्यांवर धुळीचे सामाज्र पसरलेले आहे. त्यामुळे या ५ गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.
विद्यार्थी मित्र , कामगार, नोकरवर्ग , शेतकरी , व्यवसायिक यांना रोज या रस्तावरुन ये-जा करावी लागते त्यामुळे रोजच जणू येथील ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागतात.
डाकिवली- चांबळे- लोहपे- नेवालपाडा – केळठण या ५ गावातील ग्रामस्थांनी रोड संघर्ष समिती स्थापन करुन आज डाकिवली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. सदर डाकिवली- चांबळे- लोहपे- नेवालपाडा- केळठण रोड संघर्ष समिती मार्फत सुरु असलेल्या रास्ता रोको आंदोलनास आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने आंदोलनाच्या ठिकाणी जाहिर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे वाडा तालुका कमिटी अध्यक्ष – मा. दयानंद हरळ , वाडा तालुका कमिटी उपाध्यक्ष – मा. आदेश पाटील , वाडा तालुका कमिटी उपसचिव – मा. मुकेश वाकडे , सदस्य मा. पंडित हरळ , सदस्य मा. योगेश म्हसकर हे उपस्थित होते.