
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री .रमेश राठोड
आर्णी :- यवतमाळ-नांदेड-भोकर-हिमायतनगर -किनवट-माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ ए किनवट शहरातून जात आहे पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची सबब पुढे करत जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी इको सेन्सेटिव्ह झोन कसा ? तर महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात ११ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीवरच किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संशय व्यक्त केला आहे तसे पत्र जिल्हाधिकारी यवतमाळ यांना गुरुवारी दिले आहे.
शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या रुंदीत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कुणालाही माहीत नसलेल्या किनवट संघर्ष समितीने चुकीचे सादरीकरण करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे शहरातील व तालुक्यातील नागरिकांना विश्वासात न घेता समिती कशी गठीत केली ?बोगस समितीवर माजी आमदार नाईकांनी शंका व्यक्त केली आहे अशा बोगस समित्या स्थापन करून शहराची किती वाट लावली आहे. शहरातून जाणारा हा मार्ग आयेप्पा स्वामी मंदिर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ३० मीटर रुंदीचा होणार आहे मग जिजामाता चौक ते अशोक स्तंभ हा २०० मीटर लांबीचा मार्ग चुकीच्या सादरीकरणामुळे १८ मीटर रुंदीचा बनवण्याचा घाट घातला जात आहे.
तर १८ मीटर रुंद रस्ता ठेवण्यात आल्यास रेल्वे उड्डाणपूल बनवता येणार नाही असे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ३० मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता केला तर रेल्वे उड्डाणपूल बनवता येत नाही त्यामुळे किनवटच्या विकासात बाधा आणण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. किनवट हा मराठवाड्यातील एकमेव आदिवासी, बंजारा बहुल मागास तालुका आहे भौगोलिक दृष्ट्या राज्यातील दळणवळणाकरिता अत्यंत महत्त्वाच्या अशा नागपूर ते तुळजापूर व सारखणी ते चंद्रपूर, भागलपूर ,नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाना एकमेकांना जोडणारा सर्वात कमी अंतरावरील महत्वाचा केंद्रबिंदू असल्याने गोकुंदा येथील रेल्वे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही नाईक यांनी म्हटले आहे.
या मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या निवेदनावर मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात पुन्हा योग्य पध्दतीने यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी निवेदनात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवेदन स्वीकारले आहे मिटिंग घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी येडगे यांनी शिष्टमंडळाला दिले
यावेळी माजी नगराध्यक्ष साजीतखान,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार,कचरू जोशी, रोहिदास जाधव यांची उपस्थिती होती.