
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
महावितरणला शेतकऱ्यांनी सुचना देऊनही लोंबकळत असलेले वायर बदलले नसल्याने, राचन्नावाडी येथील चार एक्कर ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान
चाकूर :- चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे विद्युत तारेचे घर्षण होऊन दि.३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजायच्या सुमारास बाबुराव संभाजी नंदगावे यांचा आडिच एक्कर व बबन माधवराव चिंचोळे यांचा दिड एक्कर असा एकूण चार एक्कर ऊस महावितरणच्या निष्काळजी पणामुळे जळून खाक झाला आहे. बाबुराव नंदगावे यांचा या अगोदरही विद्युत तारांचा स्पार्क होउन तिन एक्कर ऊस जळाला होता.त्यावेळी हाळी येथील उप अभियंता भुजबळे यांनी स्थळ पंचनामा करून शेतकऱ्यांना शेतातील खाली लोंबत असलेले तार ओढुन घेऊन दुरूस्त करण्याचे अश्वासन दिले होते.
मात्र दोन वर्षे झाले शेतकऱ्यांना फक्त अश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही.याविषयी नंदगावे यांनी महावितरण विरोधात या अगोदर ऊस जळाल्याने तक्रार दाखल केली आहे याचे प्रकरण न्यायालयात आजही सुरूच आहे पहिले जळालेल्या ऊसाचा निकाल लागण्या अधीच पुन्हा यावर्षीही नंदगावे यांचा महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे आडिच एक्कर ऊस व शेती उपयोगी साहित्य जळून चार लाख पंन्नास रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती ज्ञानोबा नंदगावे यांनी दिली आहे.
तरी यासंदर्भात त्यांनी तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता, शिरूर ताजबंद यांना ऊस महावितरणमुळे जळाली असल्याची लेखी तक्रार केली आहे.तर बबन चिंचोळे यांचा दिड एक्कर ऊस व शेति उपयोगी साहित्य जळून दोन लाखांचे नुकसान झाले आहे असे एकुण सरसरी सहा लाख पंन्नास हजाराचे महावितरणच्या निष्काळजी पणामुळे नुकसान झाले आहे.